theater flemingo in Poinguinim village in goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील अभिनय क्षमतांना आकार देणारं 'थिएटर फ्लेमिंगो'

हल्ली आपण आपल्या भावना प्रभावी तऱ्हेने व्यक्त करायला विसरलोच आहेत. जे आपल्यामार्फत व्यक्त होतं ते असतात फक्त ठसे... हे ठसे पुसण्याचं काम या कार्यशाळेत होतं.

दैनिक गोमन्तक

दक्षिण गोव्यातल्या,पैंगीण या निसर्गरम्य गांवात गेली चार वर्षे निवासी नाट्यशिबीरांचं आयोजन होते आहे हे आपल्याला ठाऊक आहे काय? नाटकात (आणि चित्रपटात) गेली काही वर्षे कार्यरत असलेला केतन जाधव आणि त्याचे इतर सहकारी, ज्यांनी नाट्यकलेचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे, मिळून हा उपक्रम ‘थिएटर फ्लॅमिंगो’ या संस्थेच्या माध्यमातून 2017 सालापासून चालवत आहेत. (Theater flemingo: Residential drama camps have been organized in Poinguinim village in goa)

पैंगीणी गांवचा परिसर आणि नजीकचा समुद्रकिनारा यांच्या सान्निध्यात ही कार्यशाळा आकार घेते. कार्यशाळेत अभिनेते, नर्तक, शिक्षक तसेच कलाप्रेमींसाठी अभिनय आणि आंगिक नाट्यासंबंधी सखोल अभ्यासक्रम राबवला जातो. कठोर शारिरीक प्रशिक्षणाद्वारे अभिनेत्याला अभिनय आणि त्याचे शरीर यामधल्या आंतरसंबंधांची जाणीव करुन दिली जाते. त्याचबरोबर प्रात्यक्षिकं आणि चर्चा यांचाही समावेश असतो. आपल्या शारिरीक लयींना अधिक विकसीत करुन, आपलं शरीर आणि मानवी भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला ही कार्यशाळा खुली आहे. खरं तर हल्ली आपण आपल्या भावना प्रभावी तऱ्हेने व्यक्त करायला विसरलोच आहेत. जे आपल्यामार्फत व्यक्त होतं ते असतात फक्त ठसे. हे ठसे पुसण्याचं काम या कार्यशाळेत होतं. कार्यशाळेत अभिनयाच्या भारतीय शैलीही शिकवल्या जातात. जशा नवरस, कलारीपयट्टू कसरती इत्यादी.

कार्यशाळेचे सारे प्रशिक्षक नाट्यशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. केतन जाधव, प्रणव टेंगसे,श्रावण फोंडेकर हे नाटक विषयाचे उच्च पदवीधर आहेत. अमोदी सनप या ‘अट्टक्कलारी’ च्या प्रशिक्षिका आहेत तर माईल्स लोबो यांनी न्यूयार्क येथील ‘ली स्टासबर्ग थिएटर ॲण्ड फिल्म इन्स्टिट्यूट’चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

गेली चार वर्षे चालू असलेल्या ‘थिएटर फ्लॅमिंगो’ च्या या उपक्रमाला देशभरातून प्रतिसाद लाभतो. पुणे, मुंबई, तामीलनाडू, केरळ या राज्यामधून त्यांना विद्यार्थी लाभतात. केतन जाधव सांगत होते, दुर्दैवाने गोव्यातून मात्र त्यांना फार कमी प्रतिसाद मिळतो. या कार्यशाळांव्यतिरीक्त ‘थिएटर फ्लॅमिंगो’ वर्षभर इतरही नाट्यविषयक कार्यक्रम राबवते. केतन जाधव नाटकांची निर्मिती करुन ती वेगवेगळ्या ठिकाणी सादर करतो. शिवाय राज्याबाहेरच्या अनेक संस्थाबरोबर सहकार्य करुन विविध नाट्यविषयक उपक्रम हातात घेतले जातात.

पुणे युनीव्हर्सिटीच्या ललीत कला केंद्रातून मास्टर्स मिळवलेला केतन स्वतः प्रयोगशील कलाकार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता लाभलेल्या अनेक नाटक - सिनेमात त्याचा सहभाग राहीलेला आहे. नाटकाच्या विविध शक्यतांचा शोध तो सतत घेत असतो. अभिनेता, अभिनय आणि नाटक यांचे शारीर पातळीवर अद्वैत शोधणाऱ्या ‘थिएटर फ्लॅमिंगो’ चा तो मुख्य कणा आहे. निवासी कार्यशाळेच्या पुढील सत्राला ऑगस्ट - सप्टेंबर या महिन्यात पैंगीण येथे आरंभ होणार आहे. गालजीबाग समुद्र किनाऱ्यावर प्रशिक्षणार्थी आपल्या शरीर क्षमतांचा शोध घेताना पुन्हा दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manache Shlok Film Controversy: ‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत साहित्याचा अपमान, चित्रपटाचे नाव तात्काळ बदला, हिंदू जनजागृती समितीची मागणी

International Purple Fest 2025: गोव्यातील समुद्रकिनारे आणि सार्वजनिक इमारती दिव्यांग-सुलभ बनवणार; मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

IND vs WI 2nd Test: शुभमन गिल दिल्लीत रचणार 'महाकीर्तिमान'? डॉन ब्रॅडमन नंतर अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला कर्णधार

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

SCROLL FOR NEXT