Hospital Dainik gomantak
गोवा

Hospital : काकोडा इस्पितळाचे काम रखडले

रुग्णांची परवड : अपुऱ्या जागेत तपासणी; कोटींची सामग्री धूळ खात

गोमन्तक डिजिटल टीम

करोडो रुपये खर्चून उभारलेली काकोडा आरोग्य केंद्राची इमारत अद्याप सुविधांपासून वंचित असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना बराच त्रास होतो. येथील शौचालयांतील नळांना गेल्या चार दिवसांपासून पाणी येत नसल्याने रुग्णांना बाहेरील नळाचे पाणी घेऊन जावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काकोडा आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी भव्य इमारत उभारली आहे. मात्र, हॉस्पिटलचे उदघाटन न झाल्याने तीन वर्षांपासून येथील सामग्री धूळ खात पडून आहे. या हॉस्पिटलमधील पाण्याचा पंप गेल्या चार दिवसांपासून निकामी झाला आहे. तो दुरुस्त न केल्याने हॉस्पिटलबाहेरील एकमेव नळाचा वापर रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचारी करतात.

म्हणे, ऑक्टोबरचा मुहूर्त

याविषयी आरोग्याधिकारी डॉ. मेधा कुडचडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, २७ तारखेला मंत्री नीलेश काब्राल यांनी जीएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली होती. त्यावेळी उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश काब्राल यांनी दिले होते. हे हॉस्पिटल ऑक्टोबरमध्ये खुले करण्याचा विचार आहे. सध्या पाण्याचा प्रश्न आहे, तो लवकरच निकालात काढणार असल्याचे कुडचडकर यांनी सांगितले.

९० टक्के काम पूर्ण : या इस्पितळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, लिफ्ट, खाटा, खुर्च्या, टेबल, स्ट्रेचर्स, व्हीलचेअर्स तसेच इतर वैद्यकीय उपकरणे आहेत. पुरुष, महिला, प्रसूती, बाह्य रुग्ण विभाग, प्रतीक्षा कक्ष, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र स्वच्छतागृह अशी या भव्य इमारतीची रचना आहे. तरीही हे इस्पितळ सुरू करण्यास चालढकलपणा केला जात आहे.

१२० कोटींचा पांढरा हत्ती

सुमारे १२० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या हॉस्पिटलमध्ये सध्या वाहनांसाठी पार्किंगची जागा आहे, तेथे रुग्णांना तपासण्यासाठी छोटे छोटे कक्ष केले आहेत. दिवसाकाठी दोनशे ते तीनशे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येतात. या छोट्याशा जागेत रुग्णांची परवड होते. तळमजल्यावर रुग्णांना तपासण्यासाठी पुरेशी जागा असूनसुद्धा ज्या ठिकाणी रुग्ण व कर्मचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा नाही, अशा ठिकाणी हॉस्पिटलचा कारभार चालतो.

नव्या इमारतीला गळती

सध्या पावसाळा सुरू झाला असून या हॉस्पिटलसाठी कोट्यवधी रुपये खर्चून पुरवलेले वैद्यकीय साहित्य इमारतीला लागलेल्या गळतीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पांढरा हत्ती बनलेल्या या इस्पितळाला उदघाटनापूर्वीच गळती लागली असून विनावापर पडून असलेल्या खाटा आणि इतर साहित्याला गंज चढू लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT