Goa News : गोवा सरकारचा कंपन्यांना दिलासा; 'त्या' निर्णयाचे फार्मा कर्मचाऱ्यांकडून स्‍वागत

गोव्‍याची ओळख बनलीय ‘फार्मा हब’ म्‍हणून औषधनिर्मिती महत्त्‍वाची
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात होत असल्याने गोवा हे ‘फार्मा हब’ म्‍हणून ओळखले जाऊ लागले आहे. औषधनिर्मिती ही अत्‍यंत महत्त्‍वाची बाब असल्‍याने, औषधांच्या तुटवड्यावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून फार्मा कंपन्‍यांमधील कर्मचाऱ्यांना संप करण्‍यास बंदी घालण्याकरिता सरकारने ‘एस्‍मा’ लागू केला आहे. या निर्णयाचे विविध फार्मा संघटनांनी तसेच उद्योग संघटनेने स्वागत केले आहे.

गोव्‍यासाठी फार्मास्युटिकल क्षेत्र हा अत्यंत महत्त्वाचा उद्योग आहे. कारण ते सरकारी तिजोरीत रोजगार आणि परकीय चलन प्रदान करते. गोवा हे औषधपुरवठ्याचे प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. गोवा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (जीपीएमए), गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन (जीएसआयए), वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) व इतर अनेक उद्योग संस्था तसेच संघटनांनी गोवा सरकारने एस्मा लागू करून कंपन्यांना दिलासा दिल्याबद्दल स्वागत केले आहे.

Goa News
Panaji News - फक्त नाले सफाईने प्रश्न सुटणार नाही - माजी नगराध्यक्ष | Gomantak TV

औषधांचा पुरवठा स्‍थिर ठेवण्‍याचा हेतू

गोव्यातील रहिवाशांना आणि समुदायाला अत्यावश्यक औषधे, आरोग्य सेवांची अखंड उपलब्धता सुनिश्चित करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. ‘एस्मा’ सरकारला आपत्कालीन परिस्थिती, संप किंवा त्यांच्या कामकाजात व्यत्यय आणू शकणाऱ्या इतर परिस्थितीत अत्यावश्यक सेवांच्या कामकाजाचे नियमन करण्याचा अधिकार देतो. फार्मास्युटिकल्‍स कंपन्यांसाठी हा कायदा लागू करून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा स्थिर ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com