Goa Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire: वणव्‍याने गाठली कर्नाटकसह महाराष्ट्राची सीमा

केंद्राला अहवाल : म्हादईत 11 ठिकाणी आग, नव्या 14 घटना; काँग्रेसकडून चौकशीची मागणी तांत्रिक कारणामुळे शुक्रवारी हवाई मोहीम रखडली

गोमन्तक डिजिटल टीम

आठवड्याभरापासून राज्यात सुरू असलेले आगीचे तांडव अद्याप सुरूच आहे. सात दिवसांपूर्वी शनिवारी म्हादई अभयारण्यात आग लागली होती. तेव्हापासून ती धुमसत आहे. आज नव्याने एका ठिकाणी आगीची घटना समोर आली असून, सध्या 11 ठिकाणची दुर्मीळ वनसंपदा आगीच्‍या भक्ष्यस्‍थानी पडली आहे.

नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू केलेली हवाई मोहीम आज तांत्रिक कारणामुळे बंद राहिली. त्यामुळे आग भडकण्याची शक्यता असून आगीच्या वणव्याने कर्नाटकाच्या सीमा गाठल्या असून महाराष्ट्राच्या हद्दीतही ती पोहोचू शकते.

राज्यभर आगीचा प्रकोप सुरूच असून आज 14 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्याची माहिती अग्निशमन आणि आपत्कालीन संचालनालयाने दिली.

राज्यातील गत आठवड्याभरापासून सुरू असलेल्या आगींच्या घटनांबाबतचा सविस्तर अहवाल वन मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या कार्यालयांना पाठवला आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने या सर्व घटनांची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

नक्की किती नुकसान?

ठिकठिकाणच्या आगींमुळे नक्की किती हेक्टर अभयारण्यातील वन जमिनीचे नुकसान झाले? याबाबतची आकडेवारी विभागाकडे नाही. मात्र, सर्व ठिकाणांची माहिती जमा केली जात असून संपूर्ण प्रकरणांची चौकशीही सुरू आहे, असे विभागाने सांगितले. साट्रे गड, मोर्लेगड चोर्ला घाट, चरवणे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वनक्षेत्राचे नुकसान होऊन दुर्मीळ वनसंपदा नष्ट झाली आहे.

तांत्रिक कारणामुळे हवाई ऑपरेशन बंद :

म्हादई अभयारण्यातील उंच, सरळ कडे, दुर्गम डोंगराळ भागात आग असल्याने ती विझविताना मानवी प्रयत्नांवर अनेक निर्बंध येत आहेत. यासाठीच नौदल आणि हवाई दलाची मदत मागण्यात आली होती. आज तांत्रिक कारणामुळे ही मोहीम बंद ठेवण्यात आल्याचे नौदलाच्या वतीने सांगण्यात आले. उद्या शनिवारी सकाळी हवाई पाहणीनंतर ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वन खात्याने दिली.

अकरा जागी आग सुरू; 512 कर्मचारी कार्यरत

राज्यभर सुरू असलेला आगीचा प्रकोप आटोक्‍यात आणण्‍यासाठी प्रशासनाचे विविध प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाचे ५१२ कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून कार्यरत आहेत. तरीही या ठिकाणी आग सुरू आहे.

1. साट्रे पारोडा 2. साट्रे सिद्धांचीकोंड 3. साट्रे पूल

4. कृष्णापूर बीट 5. देरोडे डोंगर 6. सिगाव बीट 7. काले

8. अनमोड घाट 9. तांबडी सुर्ला 10. गुरखे धारबांदोडा

11. पालये बोधला

सर्वतोपरी प्रयत्न

म्हादई अभयारण्यात आगीचा प्रकोप हा मानवनिर्मित असल्याचा संशय वनखात्याला आहे. आज नव्याने एका ठिकाणी अभयारण्यात आग लागल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी लागलेल्या आणि काही प्रमाणात विझविण्याचा प्रयत्न केलेल्या ११ ठिकाणी आग सुरूच आहे.

- विश्वजीत राणे, वनमंत्री

अग्‍नीआपत्तीकडे राज्‍य सरकारने अद्याप गांभिर्याने पाहिलेले नाही. ठोस नियोजन आणि पूर्ण क्षमतेने सरकारी यंत्रणेने कार्यान्‍वित होण्‍याची गरज आहे; अन्‍यथा निसर्गहानी वाढतच जाईल.

- राजेंद्र केरकर, पर्यावरण अभ्‍यासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

SCROLL FOR NEXT