Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

संपूर्ण क्रांतीच भाजपचा पराभव करेल: सरदेसाई

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी अशा नरकासुरांवर विजय मिळवण्यासाठी 'संपूर्ण क्रांती' ची गरज असल्याचे सांगितले.

Manish Jadhav

मुरगाव: बेरोजगारी (Unemployment), महागाई (Inflation), कचऱ्याची समस्या, भ्रष्टाचार (Corruption) आणि इंधन दरवाढ हे भाजप सरकारचे 'नरकासूर' असल्याचे सांगत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी अशा नरकासुरांवर विजय मिळवण्यासाठी 'संपूर्ण क्रांती' ची गरज असल्याचे सांगितले.

फातोर्डा येथे श्रीकृष्ण विजयोत्सवानिमित्त आयोजीत कार्यक्रमाला संबोधित करताना सरदेसाई म्हणाले की, वाईट शक्तींना आळा घालण्यासाठी गोंयकारानी सतर्क राहण्याची गरज आहे. ‘‘या भाजप सरकारने कशाप्रकारे समस्या निर्माण केल्या आहेत आणि लोकांना त्रास दिला आहे, याची जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण सर्वांनी संघटित होऊन या नरकासुरांवर विजय मिळवण्याची गरज आहे. आम्हाला आमच्या गोंय आणि गोंयकारपणाचे रक्षण करणे देखील आवश्यक आहे. ” असे ते म्हणाले. यावेळी गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर, मडगांव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन परेरा, नगरसेवक आदी उपस्थित होते. फातोर्डा युवा शक्ती आनी विजय सरदेसाई यांनी ही स्पार्धा आयोजित केली होती.

सरदेसाई म्हणाले की, विरोधी पक्षात असूनही, मडगाव पालिकेने फातोर्डामध्ये बायो-मिथेनेशन प्लांट स्थापित केला आहे, ज्यामध्ये पाच टीपीडी (प्रतिदिन टन) कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. एसजीपीडीए मार्केटमध्ये तयार होणारे अन्न, मासे, मांस आणि भाजीपाला कचऱ्यावर प्रक्रिया करणे आता शक्य झाले आहे. “कचरा हा दुसरा नरकासुर आहे. त्यामुळे आम्ही त्यावर उपाय योजले आहेत.” असे सरदेसाई म्हणाले. "भाजपने अडथळे निर्माण केले नाहीत तर आम्ही सोनसोडो येथे आणखी प्लांट आणू, कारण मडगावातच असा 35 टन कचरा निर्माण होतो." असे सरदेसाई म्हणाले.

सरदेसाई म्हणाले की, गेल्या वर्षभरात मोदी सरकारने पेट्रोलवर 28 रुपयांची वाढ केली आहे, आणि आता इतर राज्यातील निवडणुका हरल्यानंतर लोक त्यांच्या विरोधात गेल्याचे त्यांना कळाल्याने भाजपने पेट्रोलचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. "भाजप सत्तेत राहिल्यास पेट्रोलचे दर 200 रुपयांपर्यंत पोहोचणार नाहीत याची खात्री कोणीही देऊ शकत नाही." असे ते म्हणाले.

सरदेसाई म्हणाले की, लोकायुक्त यांसारख्या घटनात्मक संस्था आणि माजी राज्यपालांनीही प्रमोद सावंत सरकारला भ्रष्ट असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. गोव्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यसाठी आपला पक्ष काम करत असल्याचे ते म्हणाले. "आम्हाला बदल हवा आहे आणि तो साध्य करण्यासाठी आम्ही भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी पर्याय आणि उपाय देऊन लोकांना जागरूक करत आहोत." असे ते म्हणाले.

भाजपला पराभूत करण्याचा अजेंडा असलेल्या समविचारी पक्षांनी संपूर्ण क्रांतीसाठी एकत्र यावे, असे ते म्हणाले. "हे ध्येय साध्य करण्यासाठी मी काहीही त्याग करण्यास तयार आहे." असेही सरदेसाई म्हणाले. आनंद वाघुर्मेकर यांनी यावेळी बोलताना विजय सरदेसाई आणि फातोर्डा युवा शक्ती यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. स्पर्धेचे विजेते असे आहेत: प्रथम- साई युवक मंडळ, द्वितीय- भवानी हौशी मंडळ, तृतीय- ओंकार हौशी मंडळ, चौथे- श्रीकृष्ण कला मंडळ, पाचवे- नागेशी युथ नागेशी, सहावे- मारुदेव बांदोडा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT