India Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: पुढील चार-पाच दिवसांत 'असं' असेल गोव्यातील हवामान, पहा हवामान खात्याचा अंदाज

गोव्यात येत्या 4-5 दिवसांत तापमानात अंशत: वाढ होणे अपेक्षित

गोमन्तक डिजिटल टीम

बंगालचा उपसागर आणि लगतच्या पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गोव्यात येत्या 4-5 दिवसांत तापमानात अंशत: वाढ होणे अपेक्षित असल्याचे मत हवामान विभागाने वर्तवले आहे. सध्या गोव्यात पहाटेच्या वेळी थोडीफार थंडी जाणवत आहे. सकाळी साधारणपणे 8 वाजेपर्यंत वातावरणात गारवा जाणवतोय.

परंतु पुढील काही दिवसांत वातावरणात बदल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हिंदी महासागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात 30 जानेवारीच्या सुमारास हवेतील कमी दाबाच्या स्थितीमध्ये आणखी तीव्र वाढ होण्याची शक्यता असून हे दाब क्षेत्र 1 फेब्रुवारी पर्यंत श्रीलंकेच्या किनार्‍याजवळ पोहोचण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे.

आठवडाभरापूर्वी गोवा राज्यासह लगतच्या कोकण किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले होते. त्यातच पुढील काही दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. एकंदरीत सध्या वातावरणात वारंवार बदल होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी मात्र आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

SCROLL FOR NEXT