Goa Agriculture: गोवेकरांना आंबट चवीच्या कैऱ्या चाखायला मिळणार

इतर राज्यातून आंब्याच्या कैऱ्या बाजारात दाखल झाल्या असून 100 रूपयांना अर्धा डझन कैऱ्या विकल्या जात आहेत.
Green Mango
Green Mango Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Agriculture: राज्यातील आंबे मोहरून लहान-लहान कैऱ्या धरल्या आहेत. परंतु बाजारात महाराष्‍ट्र व इतर राज्यातून आंब्याच्या कैऱ्या दाखल झाल्या असून 100 रूपयांना अर्धा डझन कैऱ्या विकल्या जात आहेत.

अनेक फळविक्रेते या कैऱ्यांसोबतच तोतापुरी आंबे देखील विकत आहेत 200 रुपये प्रती डझन दाराने विक्री केली जात आहे.

राज्यातील भाजीपाल्याचे भाव गेले दोन आठवडे स्थिर आहेत. कांदे, बटाट्याचे भाव गेल्या महिन्याभरापासून स्थिर असून केवळ टोमॅटोच्या भावात चढ-उतार दिसून येत आहे. राज्यात भाजीपाल्यासह गावठी भाज्यांनाही चांगली मागणी आहे.

फळभाज्यांमध्ये शिमला मिरचीचे दर 80 रूपये प्रती किलो दराने विक्री केली जात आहे. इतर भाज्यांचे तर 60 च्या आसपास आहेत.

Green Mango
Mahadayi Water Dispute: म्हादई नदीचे अस्तित्व जनतेच्या लढ्यावरच अवलंबून

गावठी भाज्यांना पसंती

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात विविध प्रकारच्या पालेभाज्या प्रामुख्याने लालभाजी, मुळा, काही प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेतल्याने ही गावठी भाजी बाजारात दाखल झाली

ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात या भाजीची खरेदी होत आहे. प्रामुख्याने भेंडी, वाली, लालभाजी, मुळा, दोडका आदी भाज्यांना पसंती लाभत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Colvale jail
Goa Tree Plantation 18469 saplings planted
Wild Vegetables in Monsoon
Monsoon Wild Vegetables Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com