water problem in Arambol is serious Citizens angry Dainik Gomantak
गोवा

हरमलमध्‍ये पाण्याची समस्या गंभीर

दैनिक गोमन्तक

मोरजी : हरमल आणि परिसरात पाण्‍याची समस्‍या तीव्र बनली आहे. गेल्‍या कित्‍येक दिवसांपासून नळांना पाणीच आलेले नाही. मात्र बिले वेळेवर हातात दिली जातात, अशी माहिती संतप्‍त नागरिकांनी दिली. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, पण तो अपुरा होतो. शिवाय भांडी भरून उंच ठिकाणी पाणी नेताना खूप त्रासदायक ठरत आहे.

पेडणे (Pernem) तालुक्याला चांदेल जलप्रकल्पातून पुरविला जाणारा पाणीपुरवठा (water) अनियमित असतो. मांद्रे मतदारसंघात तर या प्रकल्‍पाचे पाणी पोचतच नाही. सध्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण ते पाणी पिण्‍यास योग्‍य नसते. तसेच ते उंच ठिकाणी नेणेही खूप जिकरीचे बनते. तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांद्रे (Mandrem) मतदारसंघातील पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन 30 एमएलडी क्षेमतेचा जलप्रकल्प उभारण्याची योजना आखली होती. परंतु नंतर ती रखडली ती पुन्‍हा सुरू झालीच नाही. परिणामी या हरमल, मांद्रे परिसरातील लोकांना पाण्‍यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आता कोठे मार्च महिना सुरू आहे. आणखी दोन महिने पाण्‍याशिवाय कसे काढायचे, हा प्रश्‍‍न लोकांना सतावत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पणजीत मांडवी पुलावर पुन्हा अपघात, तिघेजण जखमी

Colva Crime: कोलव्‍यात पुन्हा राडा! पार्टीतील वादातून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण; अर्धमेल्‍या युवकाला बाणावलीत सोडले

हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

Goa Dairy: ..अन्यथा संप पुकारु! थकीत महागाई भत्त्यासोबत इतर मागण्यांवरुन 'गोवा डेअरी’च्या कामगारांचा इशारा

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT