Khandepar River Dainik Gomantak
गोवा

Goa Rivers: खांडेपार, म्‍हादई, दूधसागर नद्यांची कमी होतेय जलपातळी

चिंताजनक बाब : मासेमारीसाठी जिलेटीनचा करण्‍यात येणार वापर घातक; वाळूउपशावरही हवे नियंत्रण

गोमन्तक डिजिटल टीम

Water Level Decreasing of Goan River: ओपा जलप्रकल्पाबरोबरच पंचवाडी जलप्रकल्पातून संपूर्ण फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो. खांडेपार, म्‍हादई आणि दूधसागर नदीच्या माध्यमातून हा पाणीपुरवठा ओपाला केला जातो.

म्हैसाळ धरणावर पंचवाडी जलप्रकल्प निर्भर आहे. सद्य:स्थितीत फोंडा तालुक्यातील खांडेपार व धारबांदोडा तालुक्यातील दूधसागर नदीवर पिण्याचे पाणी विसंबून असल्याने या नद्यांतील ऐन उन्हाळ्यात कमी होणारी जलपातळी चिंताजनक ठरते.

खांडेपार, म्‍हादई आणि दूधसागर या बारमाही वाहणाऱ्या या नद्यांच्या माध्यमातून ओपा जलप्रकल्पाला व नंतर तिसवाडी तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो.

गैरकृत्ये आधी बंद करा : नद्यांतील बेसुमार वाळूउपशामुळेही नद्यांच्या पात्रांना धोका निर्माण झाला आहे. मासेमारीसाठी नद्यांच्या पात्रात केले जाणारे जिलेटीनचे स्फोट बंद करायला हवेत. विकासकामांसाठी वाळू हवीच, पण ती किती काढावी यावरही नियंत्रण हवे.

नद्या जपायला हव्यात : आज चोर्लाघाटातील म्हादईची स्थिती काय आहे, हे सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे भविष्यकाळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून गोव्यातील सर्व नद्या जपायला हव्यात. त्यासाठी सरकारने कडक पावले उचलली पाहिजेत.

नद्यांमध्‍ये साचलीय खनिज माती

खांडेपार आणि म्‍हादई या नद्या जशा फोंडा तालुक्याशी निगडित आहे, तशाच त्‍या डिचोली तालुक्याशीही संबंधित आहे. डिचोली तालुक्यात पाळी, वेळगे, आमोणा हे खाणपट्टे तर दूधसागर नदीच्या पट्ट्यात धारबांदोडा तालुक्यातील खाणपट्टे येतात.

या खाणपट्ट्यांवर अमर्याद खनिजमालाचा उपसा आणि त्‍याची नद्यांतून बार्जमधून केली जाणारी वाहतूक यामुळे नद्यांत खनिज गाळ प्रचंड प्रमाणात साचला गेलाय. त्यामुळे जलसंपदेची मोठी हानी झाली.

अमर्याद वाळूउपसा

नद्यांच्या पात्रात अमर्याद वाळूउपसा सुरू आहे. सरकारने बंदी घातली तरी मध्यरात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जातो आणि रात्रीच मग पोलिसांशी संगनमत करून तो संबंधिताला पोचता केला जातो.

ही वाळू उपसण्यासाठी यंत्रांचाही वापर केला जात असल्याने नद्यांच्या कडा रुंदावत चालल्या आहेत. नद्यांकाठची झाडे, माड कोसळून पात्रे रुंद होत असल्याने भविष्यात घरांनाही धोका निर्माण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

Bihar Election Result Memes: नेहरुंच्या वाढदिवसापासून 'पंचायत'मधील डान्सपर्यंत...! बिहार निकालावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस VIDEO

SCROLL FOR NEXT