Polluted River Sal: नद्या वाचवूया; सुखी, समृद्ध होऊया

साळ नदी बनली ‘गटारगंगा’
Polluted River Sal
Polluted River SalDainik Gomantak
Published on
Updated on

Polluted River Sal: एकेकाळी संपूर्ण सासष्टी तालुक्याची जीवनदायिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि जुन्या काळात नदीपरिवहन दळणवळणाचा मुख्य स्त्रोत असलेल्या साळ नदीच्या गळ्याला वाढती जलपर्णी आणि वाढत्‍या प्रदुषणाचा फास लागला आहे.

या फासात तिचा गळा अधिकाधिक आवळत चालला आहे. या नदीत पाच ठिकाणांहून सांडपाणी सरळ पात्रात सोडले जाते. या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही सरकारला त्यावर उपाययोजना आखता आलेली नाही.

(Pollution is aiding the slow death of River Sal)

बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस यांनी या प्रदूषणावर विधानसभेत आवाज उठविला होता. या नदीवर मच्छीमारांची उपजीविका अवलंबून असून ती अशीच प्रदूषित स्वरूपात ठेवणे परवडणारे नाही, असे व्‍हिएगस म्‍हणाले.

असे म्हणतात की, पुरातन काळात साळ नदी भारत आणि अरब देशांत होणाऱ्या व्यापारउदिमाची मुख्य जागा होती. मडगाव येथे जे खारे बंदर (आताचे खारेबांध) होते, तेथे अरब देशांतील जहाजांतून आणलेले घोडे उतरविले जायचे. याच नदीतून मार्ग काढत ही व्यापारी जहाजे कर्नाटक आणि केरळ राज्यात जायची आणि तेथून मसाले घेऊन जायची.

Polluted River Sal
Goa Weather: आजपासून 5 दिवस तुरळक पाऊस शक्य

दुर्गंधीयुक्त नदी : अशा या एकेकाळी वैभव मिरविणाऱ्यासाळ नदीची आजची गत दुर्गंधीयुक्त नदी अशी झालेली आहे. नदीत सोडले जाणारे दूषित पाणी थांबविण्यासाठी जीओ बॅग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव यापूर्वी स्थानिक आमदारांनी ठेवला होता.

मात्र हे तंत्रज्ञान अजून वापरात येत नाही, हे या नदीचे खरे दुखणे बनले आहे. या नदीच्‍या संवर्धनासाठी आता समस्‍त गोमंतकीयांनी विशेषत: युवकांनी पुढाकार घ्‍यायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com