Tilari Dam  Dainik Gomantak
गोवा

Tilari Dam: गोव्यात तिळारीचे पाणी अखेर पोहचले मात्र, पर्वरी जलप्रकल्पातून वितरणास लागणार कालावधी

Tilari Dam: तिळारी : पर्वरी जलप्रकल्पातून वितरणास लागणार कालावधी

दैनिक गोमन्तक

Tilari Dam: तिळारी धरण कालव्याच्या दुरुस्तीनंतर पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीतील कालव्याला भगदाड पडल्याने गोव्याच्या बाजूचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. अखेर दुरुस्तीनंतर हे पाणी कालव्यातून सोडले असून पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात हे पाणी पडण्यास सुरवात झाली आहे. मात्र, हे पाणी प्रकल्पात भरल्यानंतर त्यावरील प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्या वितरणास दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

गेल्या दीड महिन्यापासून पर्वरी व साळगावचे लोक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करीत आहेत. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी गोव्यात तिळारीचे पाणी अखेर पोहचले असले तरी पर्वरी व साळगावमधील स्थानिकांना आणखी दोन ते तीन दिवस कळ सोसावी लागू शकते, अशी स्थिती आहे.

यासंदर्भात साबांखाच्या अभियंत्यांनी सांगितले की, सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे घडल्यास येत्या दोन-तीन दिवसांत पर्वरी व साळगावमधील पाण्याची समस्या सुटेल.

कालवा दुरुस्त पण...

उपलब्ध माहितीनुसार, महराष्ट्राच्या हद्दीतील तिळारी धरणाच्या कालव्याला भगदाड पडल्याने गोव्याच्या बाजूने पाणीपुरवठा बंद केला होता. परिणामी, पर्वरी व साळगाव या दोन्ही मतदारसंघांत पुन्हा पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, कालव्याची ही गळती दुरुस्त करून शेवटी कालव्यातून पाणीपुरवठा पूर्ववत झाला असून, तिळारीचे पाणी गोव्यात पोहोचले आहे. सध्या पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी साठत असून, सर्व गोष्टी नियोजनानुसार झाल्यास पर्वरी, साळगाव या दोन्ही मतदारसंघांतील पाणीटंचाई संपेल, अशी आशा साबांखाच्या अभियंत्यांनी व्यक्त केली.

पर्वरी, साळगाव तहानलेलेच

पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पस्थळी व्यवस्थित पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर सर्वत्र पाणी पुरवठ्याच्या गोष्टी सामान्य (पूर्ववत) होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा अवधी लागेल, असेही अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. सध्या पर्वरी आणि साळगाव मतदारसंघांतील लोकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT