Yuri Alemao: विधानसभेच्या सहाव्या अधिवेशनासाठी कामकाजाचे सहाच दिवस घोषित केल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या घोषणा अर्थहीन असतात आणि त्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांसाठी ‘बीएसी’ म्हणजे ‘बिझनेस ॲडव्हायजरी समिती’ नसून ती ‘भाजप सल्लागार समिती’ असल्याचा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
21 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फेब्रुवारीतील विधानसभा अधिवेशनाचे वेळापत्रक ‘बीएसी’ म्हणजे कामकाज सल्लागार समिती ठरवेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
त्याचा व्हिडीओ जारी करत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य विचार न करता आणि व्यवस्थित गृहपाठ न करता निराधार विधाने केल्याचा आरोप युरी यांनी केला आहेे.
सरकार विरोधकांना घाबरते : 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांत गोवा विधानसभेचे फक्त सहा दिवसच कामकाज होणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. पुढील अधिवेशन जुलै-ऑगस्ट २०२४ मध्येच अपेक्षित असल्याने भाजप सरकार विरोधकांना घाबरत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
विरोधी आमदारांची बैठक घेणार
मी या आठवड्याच्या अखेरीस काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावणार असून आगामी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांची बैठक घेईन. तारांकित, अतारांकित प्रश्न, शून्य तास उल्लेख, लक्षवेधी सूचना आणि खासगी सदस्यांचे कामकाज यांवर चर्चा करून निर्णय घेणार आहोत. सर्व विरोधी आमदार सरकारला घेरणार आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.