Former MP Churchill Alemao: म्‍हणे, गोव्‍याचा 80 टक्‍के विकास पोर्तुगीज पासपोर्ट मिळाल्‍यामुळेच!

Former MP Churchill Alemao: चर्चिलचे पुन्‍हा वादग्रस्‍त वक्‍तव्‍य : नेटिझन्‍सकडून टीका
Former MP Churchill Alemao
Former MP Churchill AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Former MP Churchill Alemao: यापूर्वी ऐन गोवा मुक्तिदिनाचा मुहूर्त साधून आपण पोर्तुगिजांना सलाम करतो, असे वक्‍तव्‍य करणारे माजी मंत्री तथा माजी खासदार चर्चिल आलेमाव यांनी पुन्‍हा एकदा वादग्रस्‍त विधान केले आहे. गोव्‍यात जो 80 टक्‍के विकास झाला आहे, तो गोव्‍यातील लोक पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन युरोपात काम करू लागल्‍यानेच, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. त्‍यामुळे समाज माध्‍यमांवर नेटिझन्‍सकडून आलेमाव यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे.

Former MP Churchill Alemao
GIDC: नवे नियम, उद्योगांसाठी आयडीसीच्या पायघड्या

आज (मंगळवारी) पर्वरी येथे मंत्रालयात आलेमाव काही कामानिमित्त आले असता, पत्रकारांनी त्‍यांना पोर्तुगीज पासपोर्टसंदर्भात जो वाद निर्माण झाला आहे, त्‍यावर त्‍यांचे मत विचारले असता, गोव्‍यातील रोजगाराचा प्रश्‍न या पोर्तुगीज पासपाेर्ट मिळण्‍याच्‍या सुविधेमुळे सुटला. यासाठी मी पोर्तुगालला सलाम ठोकतो, असे आलेमाव म्‍हणाले.

चर्चिलच्‍या या वक्‍तव्‍यांवर पुन्‍हा एकदा समाज माध्‍यमांवर विविध प्रतिक्रिया झळकू लागल्‍या असून चर्चिल आलेमाव यांना जर पाेर्तुगालचे एवढेच प्रेम आहे तर त्‍यांनी पाेर्तुगालातच स्‍थायिक व्‍हावे, अशाही प्रतिक्रिया व्‍यक्‍त झाल्या आहेत. चर्चिलने पाेर्तुगालची भलावण करू नये, असा सल्‍लाही देण्‍यात आला आहे.

Former MP Churchill Alemao
Goa Online Fraud: ऑनलाईन फ्रेंडशिप पडली महागात! गोव्यातील मुलीला 8.5 लाखांना गंडा

चर्चिलच्‍या वक्‍तव्‍याचा समाचार घेताना सामाजिक कार्यकर्ते सावियो रॉड्रिग्स म्‍हणाले, चर्चिलसारख्‍या राजकारण्‍यांना पाेर्तुगीज नागरिकत्‍व म्‍हणजे काय, हेच माहीत नाही.

कष्‍टामुळे राज्य समृद्ध : सावियो : गोव्‍याचा विकास हा पोर्तुगालातून आलेल्‍या पैशांतून झालेला नाही, तर भारतात राहाणाऱ्या गोमंतकीयांनी आपल्‍या कष्‍टाने गाेव्‍याला समृद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सावियो रॉड्रिग्स यांनी चर्चिलच्या विधानानंतर व्यक्त केली. विदेशातून येणारा पैसा राज्‍यासाठी महत्त्वाचा असला, तरीही राज्‍यातील अर्थव्‍यवस्‍था या विदेशी पैशांवर निश्‍चितच अवलंबून नाही, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

...तर निवडणूक लढवणार

आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्‍ही निवडणूक रिंगणात उतरणार का? असे आलेमाव यांना विचारले असता, अजून तरी त्‍याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. निवडणूक लढविणार की नाही, हे माझ्‍या तब्‍येतीवर अवलंबून असेल. आराेग्‍य साथ देत असेल तर निवडणूक लढवूही, असे ते म्‍हणाले.

भारतीय पासपोर्टही हवाच! : गोव्‍यातील ज्या नागरिकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतला आहे, त्‍यांचा भारतीय पासपोर्टही कायम ठेवला पाहिजे. गोव्‍यातील लोक पोर्तुगालात आणि युराेपात पोट भरायला जातात. मात्र, ते मतदान गोव्‍यातच करतात, असे चर्चिल म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com