कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे व आदिवासी कल्याण संचालक दशरथ रेडकर यांच्यातील असभ्य शब्दांतील ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर त्या ध्वनिफितीच्या अस्सलतेविषयी असलेली शंका आज दूर झाली.
रेडकर यांनी यासंदर्भात जास्त बोलण्यास नकार देताना ध्वनिफितीतील आवाज आपलाच असल्याचे कबूल केले. यामुळे गावडे यांच्याविषयी तीव्र संताप राज्यभरात व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या बैठकीत ही ध्वनिफीत वाजवली गेली तरी त्याची प्रत मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे नव्हती. त्यामुळे ती व्हायरल करण्यात त्यांचा हात नसावा यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गावडे विरोधकांकडूनच ती झाली असावी आणि त्यामागे कोण असावा याची एक दबकी चर्चा ऐकू येत आहे. रेडकर यांनी आपल्या मोबाईलवर ते संभाषण मुद्रित केले तरी त्याला पाय कसे फुटले. त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी कोणाला ती ध्वनिफीत पाठवली होती याची एक समांतर माहिती काढण्याचे काम सत्ताधारी गोटातून सुरू झाले आहे.
सध्या गावडे यांच्यावर अधिकाऱ्याला असभ्य भाषा वापरल्यासंदर्भात शरसंधान केले जात असले तरी ध्वनिफीत कोणी व्हायरल केली त्याचे सत्य उघडकीस आल्यावर तो रोख बदलू शकतो.
यासाठी विधानसभा अधिवेशन संपल्यानंतरचा आठवडा फार महत्त्वाचा आहे. म्हणाले, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्याने आपली प्रतिमा कृतीतून जपली पाहिजे.
आरोप संबंधित नाहीत!
गावडे यांना विचारले असता त्यांनी एका ओळीत ध्वनिफितीतील आरोप माझ्याशी संबंधित नाहीत, असे सांगितले. त्यानंतर विधानसभा कामकाज सुरू झाले, पण चर्चेला परवानगी देण्यास सभापतीनींच निरुत्साह दाखवून सरकारच्या हे प्रकरण गुंडाळण्याच्या प्रयत्नांना हातभार लावल्याचे जाणवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.