Goa Politics: विरोधकांना काढले सभागृहाबाहेर

Goa Politics: नगरनियोजन (सुधारणा) विधेयक गदारोळातच केले सरकारने संमत
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: मतदान घेण्याच्या मागणीला न जुमानता ‘गोवा नगरनियोजन (सुधारणा) विधेयक 2024’ मंजूर केल्याच्या निषेधार्थ विरोधी आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. या नव्या सुधारणेत नवीन 39 (अ) कलम आणण्यात आले असून कलम 16 (ब) रद्द करण्यात आले आहे.

दरम्‍यान, यामुळे प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार आहे. नव्या कलमाबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोरील हौद्यात उतरून निदर्शने सुरू केली. त्यामुळे सभापती रमेश तवडकर यांनी त्यांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढले. आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस यांना तर मार्शलनी अक्षरशः उचलून बाहेर काढले.

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले की, कुडचडे हे एक शहर असून काही वर्षांपूर्वी तेथील एफएआर (२) बदलून तो (१) करण्यात आला. त्‍यामुळे लोकांना दोन आणि अधिक मजली इमारती बांधताना अनेक अडथळे येत आहेत. त्‍यामुळे आत्ताचा एफएआर बदलून तो पूर्ववत करावा.

Goa Politics
Goa Politics: तवडकर-गावडे वादाचे प्रकरण गुंडाळले!

नगरनियोजन विधेयक (सुधारणा) २०२४ मधील ३९ (अ) हे कलम कुडचडेसारख्या शहरासाठी हितकर ठरेल. त्‍यानंतर या गोंधळाला सुरूवात झाली.

आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी या विधेयकातील सुधारणेला विरोध करताना त्‍यामागची सात कारणे लेखी स्वरूपात सभागृहात मांडली. वेळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी या विधेयकाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ शकतो असे मत व्यक्त केले.

Goa Politics
Goa Farming: बांबरमध्ये डोलते पारंपरिक भातशेती

आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, नगरनियोजन विधेयकातून कलम १६ (ब) वगळणे ही चांगली गोष्ट घडली आहे. आता मुख्यमंत्री आणि नगरनियोजनमंत्र्यांनी प्रादेशिक आराखड्याबाबत स्‍पष्‍ट काय ते सांगावे. या चर्चेत आमदार दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांनीही सहभाग घेतला.

भू-रुपांतरासाठी प्रक्रिया होणार सुटसुटीत

नव्या कलमाचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने विरोधक आक्रमक झाले. त्‍यांनी या कलमाच्‍या मंजुरीसाठी मतदान घेण्‍याची मागणी लावून धरली. त्‍याचवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार विजय सरदेसाई दुसऱ्या एका विषयावर बोलत होते. शेवटी गदारोळातच सभापती तवडकर यांनी आवाजी मतदानाने वरील विधेयक संमत केल्याची घोषणा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com