Minister Govind Gaude: गावडेंनी राजीनामा देऊन प्रायश्‍चित्त घ्‍यावे!

Minister Govind Gaude: महिला बनल्‍या आक्रमक : पत्‍नी रिना यांना लिहिले ‘सुसंस्‍कृत’ भाषेत पत्र
Minister Govind Gaude
Minister Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

Minister Govind Gaude: आदिवासी कल्याण संचालक दशरथ रेडकर यांना अपशब्द वापरल्याने टीकचे धनी बनलेले कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांना, त्यांची पत्नी रिना यांनी राजीनामा देऊन प्रायश्‍चित घेण्यास सांगावे, अशी मागणी रिव्होल्‍युशनरी गोवन्सच्या (आरजी) महिला कार्यकर्त्यांनी पत्र लिहून केली.

सदर पत्र या महिलांनी टपालाने पाठविले आहे. पक्षाच्या प्रियोळ महिला विभाग अध्यक्षा अनिशा वळवईकर यांनी या पत्राचे म्हार्दोळ टपाल कार्यालयासमोर वाचन केले व त्यांच्यासोबत इतर महिलांनी पत्र टपाल पेटीत पोस्ट केले.

विशेष म्‍हणजे या पत्रात काही अश्‍‍लील शब्दसंदर्भ असूनही अनिशा वळवईकर यांनी अगदी धीटपणे वाचन केले, त्याबद्दल समाजमाध्यमांवर त्‍यांचे कौतुक होत आहे.

या वादग्रस्त ध्वनिफितीविषयी मंत्री गावडे व संचालक रेडकर काय प्रतिक्रिया देतात याकडे समस्‍त गोमंतकीयांचे लक्ष लागले होते.

Minister Govind Gaude
Goa Accident Death: स्मार्ट सिटी पणजीत बळी मळा-गटारात पडून वृद्ध मृत्‍युमुखी

गावडे यांनी ‘त्यात काही तथ्य नाही’ अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र संचालक रेडकर यांनी ‘तो आवाज आपलाच आहे’ असे पत्रकारांना सांगितले. त्‍यामुळे गावडेंच्‍या विरोधात सर्व थरांतून संताप व्‍यक्त होऊ लागला आहे.

‘त्‍या’ शब्‍दाने तमाम महिलांचा अपमान : सदर ध्वनिफित सर्वप्रथम ‘गोमन्‍तक टीव्ही’वरून प्रसारित करण्यात आली. त्या ध्वनिफितीत मंत्री गावडे यांनी उच्चारलेला एक शब्द एवढा अश्‍‍लील व असंसदीय आहे की त्‍याची वाच्‍यता करणे योग्‍य वाटत नव्‍हते. पण प्रियोळ येथील काही भगिनींनी व ‘आरजी’च्‍या महिला कार्यकर्त्यांनी मंत्री गावडे यांच्या सौभाग्यवती रिना गावडे यांना, अगदी सभ्य व सुसंस्कृत भाषेत त्‍यांच्‍या पतीने कोणता असभ्य शब्द वापरलाय ते पत्र लिहून कळविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com