Mumbai Airport Runway Viral Video X, Screenshots
गोवा

Viral Video: गोवा-दिल्ली फ्लाइटमधील प्रवशांचा Mumbai Airport वर कल्ला, 'रन वे'वर बैठक ठोकत मारला रात्रीच्या जेवणावर ताव

Indigo Flight च्या सहवैमानिकाला उड्डाण करण्यास उशीर झाल्यामुळे प्रवाशाने मारहाण केल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर काही तासांनंतर, सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ समोर आला आहे.

Ashutosh Masgaunde

The video that is going viral is from the Mumbai airport, where some people are seen sitting on the 'runway' eating and relaxing:

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्ही थक्क व्हाल. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई विमानतळावरचा आहे, जिथे काही लोक 'रनवे'वर बसून जेवताना आणि आराम करताना दिसत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने मुंबई विमानतळाच्या 'रन वे'वर बसलेल्या प्रवाशांची छायाचित्रेही शेअर केली आहेत, जिथे इंडिगोची विमानेही दिसत आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, गोव्याहून दिल्लीला जाणारे इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E 2195 (इंडिगो गोवा-दिल्ली फ्लाइट) ऑपरेशनल समस्यांमुळे मुंबईकडे वळवण्यात आले. वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, विमानतळाच्या सूत्रांनी उड्डाण वळवल्याची पुष्टी केली आहे.

एका प्रवाशाने ट्विट करून लिहिले की, 'इंडिगोच्या गोवा-दिल्ली फ्लाइटला 12 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यानंतर प्रवाशांनी इंडिगो विमानाच्या शेजारी बसून जेवण केले.'

इंडिगो फ्लाइटच्या सहवैमानिकाला उड्डाण करण्यास उशीर झाल्यामुळे प्रवाशाने मारहाण केल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर काही तासांनंतर, सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्रवासी रात्रीचे जेवण रन वे वर करताना दिसत आहेत.

ट्विटरवर अनेक यूजर्सनी दावा केला की, 14 जानेवारी रोजी गोवा ते दिल्ली इंडिगो फ्लाइटला सुमारे 18 तास उशीर झाला आणि नंतर ते मुंबईकडे वळवण्यात आले.

उड्डणास झालेल्या विलंबामुळे निराश झालेल्या 6E2195 फ्लाइटच्या प्रवाशांनी इंडिगो विमानाच्या शेजारी बसून रनवेवर विश्रांती घेण्याचे आणि रात्रीचे जेवण करण्याचा निर्णय घेतला. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये काही प्रवासी जेवण करताना दिसत आहेत. तर काही प्रवासी धावपट्टीवर विश्रांती घेत आहेत.

ही फ्लाइट 14 जानेवारी (रविवार) सकाळी 9:15 वाजता गोव्याहून दिल्लीला निघणार होते, परंतु ते संध्याकाळी टेक ऑफ करून 15 जानेवारी (सोमवार) सकाळी 5:12 वाजता मुंबईत उतरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT