A Guwahati-Agartala IndiGo flight caused chaos after a passenger tried to open the plane's emergency door mid-air: गुवाहाटी-अगरतळा इंडिगो फ्लाइटमधील एका प्रवाशाने विमानाचे आपत्कालीन दार हवेतच उघडण्याचा प्रयत्न केल्याने गुरुवारी विमानात गोंधळ उडाला. घटनेच्या वेळी प्रवासी ड्रग्जच्या नशेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात फ्लाइटचे क्रू मेंबर्स आणि प्रवाशांनी माथेफिरूला माणसाला धरून ठेवलेले दिसत आहे.
स्वत:ला सांभाळून न शकणाऱ्या या माथेफिरुला एका पुरुष क्रू सदस्याने पकडले आणि ओढत नेले. यावेळी एक महिला क्रू मेंबर इतर प्रवाशांना मार्ग मोकळा करण्याची विनंती करताना ऐकू येत होती.
त्रिपुरा पोलिसांचे प्रवक्ते ज्योतिस्मान दास चौधरी यांनी सांगितले की, 41 वर्षीय देबनाथ गुवाहाटी-अगरतळा इंडिगो फ्लाइटमध्ये होता. त्याने विमानाचे आपत्कालीन दार उघडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सतर्क प्रवाशांनी त्याला मागे खेचले.
दास चौधरी यांनी आयएएनएसला सांगितले, "जेव्हा क्रू मेंबर्सनी त्याला त्या च्या सीटवर जाण्यास सांगितले तेव्हा देबनाथने त्यांच्याशी गैरवर्तन केले. देबनाथ ड्रग्जच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप सहप्रवाशांनी केला आहे."
आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम विमानतळावर विमान उतरल्यानंतर विमानतळ पोलिसांनी प्रवाशाला अटक केली.
इंडिगोचे विमान 180 प्रवाशांसह गुवाहाटीहून आगरतळासाठी रवाना झाले होते. विमानाच्या आपत्कालीन दरवाजाजवळ बसलेल्या एकाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरू केला.
त्याच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या एका प्रवाशाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करत आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
ही बाब विमान क्रू मेंबर्सच्या लक्षात येताच त्यांनी धावपळ सुरू केली. मात्र त्याने सहप्रवाशांकडे दुर्लक्ष करत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विमानातील इतर प्रवाशांनी त्या तरुणाला ओढून मारहाण केली. या घटनेमुळे विमान प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कसेबसे विमान आगरतळा विमानतळावर सुखरूप उतरले. तेथे ताब्यात घेतलेल्या आरोपी तरुणाला इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
त्याच्यावर काही कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने नशेच्या गोळ्या प्राशन करून हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिस्वजित देबनाथ असे या प्रवाशाचे नाव आहे.
या घटनेबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे प्रभारी ओसी अभिजीत मंडल म्हणाले की, या घटनेची संपूर्ण माहिती विमानतळ प्राधिकरणाने पोलीस ठाण्यात पाठवली आहे.
पोलिसांनी विमानतळावर पोहोचून आरोपी विश्वजित देबनाथला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.