Tulsi Vivah 2022 Dainik Gomamntak
गोवा

Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहाची तयारी शिगेला; अबालवृद्धांनी कसली कंबर

तुळशी विवाहाला गोव्यात खास महत्त्व

दैनिक गोमन्तक

आज (शनिवारी) साजऱ्या होणाऱ्या व्हडल्या दिवळीची म्हणजेच तुळशी विवाहाची तयारी जय्यत सुरु झाली आहे. घरांच्या अंगणातील तुळशी वृंदावने सजवण्यात लहानाबरोबर मोठ्यांनीही आपली कंबर कसली आहे.

(The vasco market blossomed with material for Tulsi Vivah)

वास्कोत तुळशी विवाहाच्या साहित्याने बाजार सजला आहे. तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या वस्‍तूंनी वास्को बाजारपेठ गजबजली आहे. ऊस, चिरमुले, चिंच, आवळे अशा विविध वस्तू बाजारात दाखल झालेल्‍या आहेत. त्या वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

दिवाळीला गोव्यात खास महत्व आहे. व्हडली दिवाळी म्हणजेच देव दिवाळीला शनिवारी सुरुवात होत आहे. कार्तिक एकादशीपासून ते पौ पर्यक तुळशी विवाह लावण्याची प्रथा आहे. तुळशी विवाहाला गोव्यात खास महत्त्व आहे. अनेक घरांत उद्या शनिवारी विवाह लावले जातील. बहुतांश घरांत कार्तिक एकादशीलाच तुळशी विवाह लावण्याची प्रथा आहे.

Tulsi Vivah 2022

हिंदू परंपरेनुसार तुळशी विवाह लावल्यानंतर घरातील लग्नकार्यास सुरुवात होते. दरम्यान तुळशी विवाहाची खास तयारी सुरु झाली आहे. तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी, सजावट यावर भर दिला जातो. तसेच तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य बाजारात सज्ज झाले आहे. तुळशी विवाहासाठी लागणारे ऊस, चिंच, आवळा, दिंडा आदी वस्तू वास्को बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT