स्वयंसहाय्य गटांकडून विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहाराबाबतचे दर वाढवले जावेत यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. या गटांनी मागणी करताना सध्याच्या दरात माध्यान्ह भोजन पुरवणे परवडत नाही, त्यामूळे सरकारने दर वाढ करावी असे म्हटले होते. ही मागणी सावंत सरकारने आता मान्य केली असून याबाबतचे नवे दर ही प्रसिद्ध केले आहेत.
( Pramod Sawant Government Increased rates of school student midday meal)
पाचवीपर्यंत 8 रुपये तर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 10 रुपये
माध्यान्ह आहार योजनेच्या प्रारंभी सरकार प्रतिविद्यार्थी 2 रुपये 50 पैसे देत होते. कोरोनानंतर पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना 6 रुपये 11 पैसे व आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 7 रुपये 45 पैसे दिले जात. मात्र, स्वयंसहाय्य गटांनी मागणी केल्यानुसार आता पाचवीपर्यंत 8 रुपये तर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 10 रुपयांची केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी माध्यान्ह आहार पुरवणाऱ्या स्वयंसहाय्य गटांची मागणी मान्य केली आहे. या याबरोबरच आहाराच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड सहन करणार नाही असे म्हटले आहे. स्वयंसहाय्य गटांनी दरवाढ न केल्यास बंदचे शस्त्र उपसणार असल्याचं म्हटलं होतं. यावरुन मुख्यमंत्री म्हणाले, स्वयंसहाय्य गटांना पैसे देण्यासाठी अडचण नाही. पैसे वाढवतो मात्र दर्जा सुधारायला हवा. त्यामूळे मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला आहे. आता वेळ आहे ती स्वयंसहाय्य गटांनी आपला शब्द पाळण्याची.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.