CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Tribals Political Reservation: 'आदिवासींच्या आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मांडावा’

CM Pramod Sawant: सध्या आदिवासीच्या वेगवेगळ्या समस्या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी उटाच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये बैठका सुरु असून सासष्टीतील बैठकीच्या वेळी वेळीप यांनी वरील मागणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Tribals Political Reservation: आदिवासीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्र्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडावा, अशी मागणी द युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केली आहे.

सध्या आदिवासीच्या वेगवेगळ्या समस्या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी उटाच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये बैठका सुरु असून सासष्टीतील बैठकीच्या वेळी वेळीप यांनी वरील मागणी केली. यावेळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच आदिवासीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्र्न सोडवू शकते, असा विश्र्वास वेळीप यांनी व्यक्त केला.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर संसदेत या संदर्भात विधेयक मांडले जाईल, असे गत केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदिवासीची राजकीय आरक्षणाबद्दलची मागणी केंद्राकडे मांडावी. सासष्टीतील या बैठकीत सरकारी योजना सर्व आदिवासी समाजापर्यंत पोहोचतात की काय? या बद्दलचा आढावा घेण्यात आला, असेही वेळीप यांनी सांगितले. या बैठकीला कला व संस्कृती तथा क्रीडा मंत्री गोविंद गावडे व उटाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Story: 21 पत्नी, पण 8 जणींचीच नावं लक्षात! भीक मागण्यासाठी रोज एका पत्नीला सोबत नेतो 'हा' बांगलादेशी; व्हिडीओ व्हायरल

Tilak Varma T20 Record: 5 शतके आणि 30 अर्धशतके! टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा महापराक्रम, किंग कोहलीला सोडले मागे

FDA Raid:गोव्यात एफडीएचा दणका!बार्देशमधील 4 हॉटेल्स-विक्री केंद्रांचे कामकाज बंद करण्याचे आदेश

Cyber Fraud: गोव्यात ज्येष्ठ नागरिकाला 2.83 लाखांचा गंडा; भीती दाखवून बँक खात्यातून रक्कम लंपास, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात FIR दाखल

Navratri Wishes In Marathi: नऊ दिवस, नऊ रंग अन् देवीच्या भक्तीचा सोहळा! शारदीय नवरात्रीनिमित्त WhatsApp स्टेटस, Facebook पोस्टसाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT