Mapusa Traffic congestion Dainik Gomantak
गोवा

Mapusa Traffic congestion: शहरवासियांना वाहनकोंडीपासून मिळणार दिलासा, पालिकेकडून 'या' यंत्रणेला 'ग्रीन सिग्नल'

चाचणी यशस्वी : उद्यापर्यंत तीन ठिकाणी यंत्रणा

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Traffic congestion म्हापसा येथील शहरातील ट्रॅफिक सिग्नल्स कार्यान्वित करण्याचा म्हापसा पालिकेचा अखेर मुहूर्त सापडला असून येत्या दोन दिवसांत (बुधवार) ही यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे.

या सिग्नल्सची सोमवारी यशस्वी चाचणी करण्यात आली असून, सुरवातीला तीन परिसरातील सिग्नल्स चालू होतील व त्यानंतर उर्वरित सिग्नल्स हे आठवड्याभरात सुरू केले जाणार आहेत.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हापसा पालिका नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी सांगितले की, म्हापसा पालिका कार्यक्षेत्रातील सिग्नल्स यंत्रणेची सोमवारी चाचणी करण्यात आली.

त्यानुसार, येत्या दोन दिवसांत म्हणजे बुधवारपर्यंत कोर्ट जंक्शनसह तीन जागेवरील सिग्नल्स कार्यान्वित होतील. त्यानंतर उर्वरित यंत्रणा (सिग्नल्स) चालू होण्यास आठवडा लागेल.

म्हापसा शहरातील कोर्ट जंक्शन, हळदोणा बसस्थानक व जुनी पालिका इमारत या परिसरातील तीन सिग्नल्स ही येत्या बुधवारपर्यंत (ता.२८) कार्यान्वित होतील.

तर त्यानंतर उर्वरित परिसर म्हणजे, गांधी चौक, साबांखा कार्यालयसमोर (म्हापसा) व हुतात्मा चौकातील ट्रॅफिक सिग्नल्स हे आठवड्याभरात चालू होणार.

दरम्यान, कोर्ट जंक्शन परिसरात सकाळ व सायंकाळच्या वेळी गर्दी अधिक असते. त्यामुळे सिग्नल्सचा वेळ हा ६० ते ७० सिंकेद असेल. तर दुपारी ३ ते ४.३०च्या सुमारास सिग्नल्सची वेळमर्यादा ही २६ सेकंद राहिल.

आणि आवश्यकतेनुसार या वेळेत वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार बदल केला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT