Panajim Smart City : भर पावसात ‘स्मार्ट सिटी’तील समस्या वाढल्या, अर्धवट कामांमुळे व्यावसायिक आक्रमक

नागरिकांनी आमदारांकडेही तक्रारी केल्या, पण त्याचाही काही फायदा होत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
Panajim Smart City
Panajim Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Panajim Smart City : पणजीच्या सांतिनेज भागातील स्मार्ट रस्त्याच्या बाजूच्या गटाराचे काम बाकी राहिले आहे. गटाराचे काम न केल्याने या ठिकाणी आत्तापासून पाणी साचू लागले आहे. त्यामुळे यापुढे पावसाचा आणखी जोर वाढल्यास येथील व्यावसायिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याने येथील व्यावसायिकांनी रस्ता अडविला.

सांतिनेजमधील काकुलो मॉलकडून मधुबन कॉम्प्लेक्सकडे येणाऱ्या रस्त्याचे स्मार्ट रस्त्यात रुपांतर करण्याचे काम सुरुवातीलाच सुरू झाले. या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणीच पहिला अपघात घडला. या रस्त्यावर मलनिस्सारणाचे चेंबर उभारताना चिऱ्याचा डंपर कलंडला होता. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या रस्त्याचे काम गतीने होईल असे वाटत होते पण तसे झाले नाही. किमान रस्त्याच्या बाजूच्या गटाराचे काम पावसाळ्याच्या तोंडावर त्वरित करणे अपेक्षीत होते, पण ते काम अर्धवटच राहिले. खाडीवरील दोन्ही पूल उभारले गेले, पण रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.

Panajim Smart City
Panaji Rainfall: पणजीत अर्धा-पाऊण तासाच्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाण्याचे लोट; वाहनधारकांची तारांबळ

गटारांचे अर्धवट काम करून सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील जनतेच्या समस्या ऐकायला कोणीही नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याशिवाय नागरिकांनी आमदारांकडेही तक्रारी केल्या, पण त्याचाही काही फायदा होत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

काहीही उपयोग नाही

दोन्ही बाजूंच्या गटाराचे काम बाकी राहिल्याने येथील व्यावसायिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नगरसेवकांकडे तक्रारी केल्या तरी त्याचा काही उपयोग होत नसल्याचे येथील व्यावसायिक सांगतात.

Panajim Smart City
Goa Congress : मुख्यमंत्र्यांची 'ती' घोषणा केवळ निवडणूक जुमला : युरी आलेमाव

चर खोदाईमुळेच गैरसोयीत वाढ

स्मार्ट सिटीत गेले वर्षभर कामे सुरू होती. अनेक ठिकाणी रेंगाळली. काही कामे घाईगडबडीत केली गेली, तर काही ठिकाणी फक्त चर खोदले, पण तेथे काम झालेच नाही. त्यामुळे व्यावसायिकांना खूपच अडचणी निर्माण होत आहेत. दुकानासमोरील गटारासाठी चर खोदून ठेवण्यात आला आहे. गटाराचे काम करायचे नव्हते, तर चर खोदायलाच नको होते. पण या खोदाईमुळे अनेक गैरसोयी होत आहेत, म्हणूनच कंत्राटदाराविरुद्ध तक्रार केल्याचे येथील दुकानदाराने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com