Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Minister Rohan Khaunte: ‘चलो अयोध्या’ उपक्रमाचा देशाने अभिमान बाळगावा

Minister Rohan Khaunte: गोंयकारपण दाखविण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

Minister Rohan Khaunte: गोवा केवळ समुद्रकिनारे, नाईट लाइफ एवढ्यापुरताच मर्यादित नसून त्यापलीकडे जाऊन गोव्याची पारंपरिकता, संस्कृती व खरे दायज (ठेवा) दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. गोवा ही ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखली जाते व त्यादृष्टीने पर्यटकांपर्यंत ती पोहोचविण्याचे आम्ही सध्या काम करत आहोत.

मुळात गोव्यातील गावांमधील गोंयकारपण सर्वांना दाखविण्याची वेळ आली असून, त्याअनुषंगाने प्रयत्न सुरू असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले.

मंगळवारी (ता.१९) गोवा मुक्तिदिनानिमित्त म्हापशातील बार्देश प्रशासकीय कार्यालयस्थळी ध्वजारोहण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात खंवटे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.

दरम्यान, पर्यटनमंत्र्यांनी प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात आधी ध्वजारोहण केले. त्यानंतर पोलिस व शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलनाची त्यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या काही खेळाडूंचा मंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तसेच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, बार्देश उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी. मामलेदार प्रवीण गावस, उपअधीक्षक जीवबा दळवी व इतर पदाधिकारी हजर होते.

गोवा मुक्तिदिनाविषयी बोलताना मंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यसेनानींनी देश व गोव्याच्या मुक्तीसाठी दिलेल्या आहुतीचे प्रत्येकांनी सदैव स्मरण ठेवावे. त्यांच्या निःस्वार्थ बलिदानामुळे आज आम्ही गोमंतकीय स्वातंत्र्य उपभोगत आहोत.

पर्यटन खात्याने ‘होम-स्टे’सारखी योजना अस्तित्वात आणली असून अ‍ॅग्रो-इको, वेलनेस व ॲडव्हेंचर योजना या येत्या मार्चपर्यंत अस्तित्वात आणणार. होम-स्टेच्या माध्यमातून आम्ही महिला सक्षक्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे, ‘चलो अयोध्या’ उपक्रम हा फक्त गोव्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाने याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे आवाहन पर्यटनमंत्र्यांनी केले.

शिवशौर्य यात्रा आम्ही राज्यातील मुख्य शहरात साजरी केली. ज्यात पणजी, मडगाव, म्हापसा, फोंडा व वास्को या पाच शहरांचा सहभाग होता. तर मुख्य सोहळा डिचोलीमध्ये साजरा केला जाईल. तसेच पर्यटन खात्याने दीपोत्सव, चिखलकाला यासारखे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या स्तरावर साजरे केले. यातून गोव्याला देशाबाहेर मानपत्र व ओळख मिळाली. तसेच दक्षिण गोव्यात येणाऱ्या काळात ‘वीरभद्र’ हा कार्यक्रम साजरा केला जाईल, असे सुतोवाच मंत्र्यांनी केले.

घरोघरी व गावात फायबर योजना पोहोचावी यासाठी आयटी विभागाच्या माध्यमातून पाऊल टाकले होते. आणि केंद्राच्या साहाय्याने येत्या तीन-चार महिन्यांत ‘हर घर फायबर’ ही संकल्पना चालू करणार आहोत. यातून इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्वांना मिळेल. ही संकल्पना यशस्वी झाल्यास डिजिटलायझेशन विचारांचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवता येतील.
- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT