Sunburn Festival: सनबर्न फेस्‍टीवलमध्‍ये होणार ड्रग्‍ज तपासणी

Sunburn Festival: अधीक्षक निधीन वाल्सन : विशेष यंत्रणा ठेवणार लक्ष, साध्या वेशात पोलिसांची फौज
Sunburn Festival
Sunburn FestivalDainik Gomantak

Sunburn Festival: वागातोर येथे होणाऱ्या ‘सनबर्न’ ईडीएम फेस्टिव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा ड्रग्जचा वापर व ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची विशेष शोध पथके स्थापन करण्यात येणार आहेत. फेस्टीव्हलमध्ये ड्रग्ज सेवन करून उपस्थिती लावलेल्यांची तपासणी तसेच या परिसरात ड्रग्ज विक्रीला आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पोलिसही तैनात केले जातील अशी माहिती उत्तर गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

Sunburn Festival
Goa Politics:...तर ‘आरजी’ भाजपमध्ये विलीन करू: मनोज परब

पर्यावरण खात्याच्या सचिवांनी सनबर्न, इव्हेंट्सना परवानगी देण्यासाठी विशेष विभाग स्थापन केल्याचा आदेश काढला आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्यसचिव, पोलिस अधीक्षक व उपजिल्हाधिकारी हे सदस्य आहेत. या आदेशामध्ये परवानगी देताना तीन बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.

या विभागाची बैठक लवकरच होईल व त्यावेळी सनबर्न ईडीएम फेस्टीव्हलच्या काळात ध्वनीप्रदूषणप्रकरणी आवश्‍यक त्या उपाययोजना तसेच तेथे तीन दिवस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी सनबर्न फेस्टीव्हल कोणत्याही अनुचित घटनेविना झाला होता. यावर्षी सुरक्षा उपाययोजना म्हणून विशेष शोध पथके स्थापन करण्यात येणार आहे.

पथक काय करणार?

  • पथकात अमलीपदार्थविरोधी कक्ष, गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच) तसेच स्थानिक पोलिस स्थानकाची विशेष पथक या फेस्टीव्हलवेळी कार्यरत असतील.

  • याव्यतिरिक्त उत्तर गोव्यातील वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी तेथे जाऊन परिस्थितीवर नजर ठेवणार आहेत. पोलिसांबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही उपस्थित असतील.

  • सनबर्नच्या म्युझिक सिस्टिमचा आवाज त्यांना देण्यात आलेल्या परवानगीपेक्षा वाढल्यास त्याची मोपमाप करणारे यंत्रे मंडळातर्फे तेथे बसवण्यात येणार आहेत.

  • त्यामुळे जे गेल्यावर्षी उल्लंघन झाले त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तीनही दिवस पोलिस व मंडळाचे अधिकारी तेथे तैनात असतील. ध्वनीचे उल्लंघन झाल्यास त्वरित म्युझिक सिस्टीम जप्त करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com