Suicide News Dainik Gomantak
गोवा

Goa Teacher: ...म्हणून, चौथ्या मजल्यावरून उडी मारून शिक्षिकेने संपविले जीवन

Goa Teacher: कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता फर्नांडिस या मूळ सांगे येथील रहिवासी असून त्या पती व मुलीसह काऱ्यामड्डी-कुडचडे येथे फ्लॅटमध्ये राहात होत्या.

दैनिक गोमन्तक

Goa Teacher: काऱ्यामड्डी-कुडचडे येथे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून अनिता फर्नांडिस (५४) या शिक्षिकेने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता.२८) सकाळी 6 वाजता घडली. कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता फर्नांडिस या मूळ सांगे येथील रहिवासी असून त्या पती व मुलीसह काऱ्यामड्डी-कुडचडे येथे फ्लॅटमध्ये राहात होत्या.

सकाळी 6 वाजता अनिता यांनी फ्लॅटचा मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली. इमारतीवरून उडी मारल्याने अनिता जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते पाहून लोकांना प्रचंड धक्का बसला. त्यांना कुडचडे आरोग्य केंद्रात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

कुडचडे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथे जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठविला असून कुडचडे पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुलगीही शिक्षिका

अनिता या उगे-सांगे येथे प्राथमिक विद्यालयात शिक्षिका होत्या, तसेच त्यांची मुलगीही शिक्षिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनिता यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलाबद्दल परिसरातील लोकांना प्रचंड धक्का बसला आहे. या घटनेची कुडचडेत दिवसभर चर्चा सुरू होती.

वैद्यकीय उपचार होते सुरू

अनिता फर्नांडिस यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांना रात्री झोपही लागत नव्हती. अनिता यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT