Old Goa Road Dainik Gomantak
गोवा

Old Goa Road: सांतान येथील रस्ता अचानक बंद

Old Goa Road: वाहनचालकांची गैरसोय: दुचाकीस्वारांनाही वाट नसल्याने स्थानिकांत संताप

दैनिक गोमन्तक

Old Goa Road: सांतान – जुने गोवा रस्त्यावरील संरक्षण भिंत जुलै 2023 मध्ये कोसळली होती, तेव्हा पासून हा रस्ता चार चाकी वाहनांसाठी बंद होता. रविवारी सांतानवासीयांनी रस्त्याचे काम पुन्हा कधी सुरू होईल, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याला सात दिवसांची मुदत दिल्यानंतर मातीचा भराव टाकून रस्ता दुचाकींसाठीही कायमचा बंद करून टाकला आहे. त्यामुळे स्थानिकांत संताप पसरला आहे.

अचानक मातीचा भराव टाकून रस्ता बंद केल्याने नियमितपणे दुचाकी घेऊन जाणाऱ्यांची तारंबळ उडाली. सकाळी सांतान चर्चजवळ पोहोचल्यानंतर रस्ता बंद केल्याचे समजले. रस्ता बंद केल्याने पणजी आणि जुने गोवेकडे जाणाऱ्यांना लांब फेरा पडला.

बांधकाम खात्याला घेरावचा इशारा

गेल्या रविवारी कुडका-बांबोळी-तळावली पंचायतीचे उपसरपंच विनेश आडपईकर, पंचसदस्य मारिया डिकुन्हा, आपचे नेते प्रा. रामराव वाघ व सांतानवासीयांनी एकत्र येऊन रस्त्याच्या कामाबाबत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात सरकारला जाब विचारला होता.

तसेच सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण न दिल्यास सार्वजनिक बांधकाम खात्यात येऊन घेराव घालणार असल्याचा इशारा दिला होता.

चौकशी करा !

रस्त्याच्या बाजूची सरंक्षण भिंत ही जुलै २०२३ मध्ये कोसळली होती, आता आम्ही जानेवारी २०२४ मध्ये पोहोचलो आहोत. हा रस्ता बंद झाल्याने सर्वसामान्यांना त्रास होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद केला, परंतु संरक्षण भिंत कोणत्या कारणांमुळे कोसळली याची सविस्तर चौकशी दक्षता खात्याद्वारे झाली पाहिजे. कंत्राटदाराची आणि अभियंत्याची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT