Purple Fest: ‘एलिम्को’द्वारे पर्पल महोत्सवात 4 लाखांची उपकरणे वितरित

Purple Fest: पर्पल फेस्ट मध्ये विविध कार्यक्रम: साहाय्यक उपकरणांमुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य
Purple Fest In Goa
Purple Fest In GoaDainik Gomantak

Purple Fest: राज्यात कालपासून सुरू झालेल्या ‘पर्पल फेस्ट’मधे देश-विदेशातील दिव्यांग, दिव्यांगासाठी कार्यरत संस्था आल्या आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘एलिम्को’द्वारे पर्पल महोत्सवात दाखल झालेल्या दिव्यांगांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपकरणे देण्यात येत आहेत.

Purple Fest In Goa
Goa News: 41 वर्षांनंतर अमीरभाईंनी पाहिले मुलांचे चेहरे

ठराविक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ही उपकरणे उपलब्धतेनुसार दिव्यांग व्यक्तींना दिली जातात. सोमवारी दिवसभरात सुमारे ४ लाख रू. किंमतीची उपकरणे दिव्यांगांना मोफत वितरित केल्याचे ‘एलिम्को’चे पीएनओ अधिकारी गौरीश साळुंके यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. दिव्यांगांसाठी देण्यात येणाऱ्या उपकरणांमध्ये व्हिलचेअर, ब्रेल कीट, कानाची मशीन, सी.पी.चेअर, अंधासाठीची काठी, कुबडी, फिल्ड वॉकर, तीनचाकी, चष्मा, कमरेचा पट्टा, आदींचा समावेश आहे.

यावेळी देशभरातून आलेल्या दिव्यांगांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या उपकरण वाटपाच्या सुविधेचा लाभ घेतला. काही दिव्यांगांनी उपकरणे मिळावीत,यासाठी नाव नोंदणी केली. दिव्यांगांना कार्यक्रमाच्या ठिकाणी मदतीसाठी सर्व त्या सुविधा आणि मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच दिव्यांगजन आयोगाचे कर्मचारी आणि दिव्यांगजन आयुक्त गुरूप्रसाद पावसकर यांनी दिव्यांगांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

‘गोमेकॉ’त कायमस्वरूपी केंद्र : राज्यातील दिव्यांगांना लागणारी साहाय्यक उपकरणे सोयिस्करपणे मिळावी यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात या महोत्सवादरम्यान कायम स्वरूपी केंद्र सुरू केले जाणार आहे. जेणेकरून राज्यातील दिव्यांगांना मोफत आणि सुरळीतपणे ही उपकरणे मिळणार आहेत.

ही कागदपत्रे द्या!

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड किंवा नोंदणी केल्याची पावती, आधारकार्ड, उत्पन्न दाखला, या कागदपत्रांची आवश्‍यकता आहे. ही उपकरणे प्राप्तकर्त्या दिव्यांगाचे वार्षिक उत्पन्न २.७० लाखांहून अधिक असता कामा नये. मंगळवारी दुपारपर्यंत सुमारे १२८ हून अधिक दिव्यांग व्यक्तींनी उपकरणे मिळविण्यासाठी नोंदणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com