Chief Minister Pramod Sawant

 

Dainik Gomantak

गोवा

'गोव्याचा खरा विकास 2014 पासून झाला': प्रमोद सावंत

६० व्या गोवा मुक्तीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात आले आहेत. त्यांचे मी गोव्याच्या जनतेकडून हार्दिक स्वागत करतो.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यातच आता आज गोवा मुक्तीदिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज गोवा दौऱ्यावर आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान मोदी योजनांची घोषणा करणार आहेत. गोवा मुक्ती दिनानिमित्त पंतप्रधान कोणत्या घोषणा करणार आहेत. याकडे अवघ्या गोव्याचे आणि देशाचे लक्ष लागले आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोवा मुक्तीदिनानिमित्त संबोधित करताना गोव्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ''60 व्या गोवा मुक्तीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात आले आहेत. त्यांचे मी गोव्याच्या जनतेकडून हार्दिक स्वागत करतो. गोवा राज्याच्या इतिहासातील हा अविस्मरणीय क्षण आहे. गोव्याची जनता पंतप्रधान मोदी यांना अभिवादन करण्यासाठी आली आहे. 19 डिसेंबर 1961 रोजी 'ऑपरेशन विजय' माध्यमातून गोव्याला पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी राबविण्यात आले होते. आपल्या प्राणाची आहुती देऊन गोव्याला मुक्त केले.''

दरम्यान ते पुढे म्हणाले, कोरोना काळात गोव्याने ज्याप्रमाणे काम केले त्याचा देशात गौरव करण्यात आला. त्याचबरोबर आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या. याच कोरोना काळात राज्य सरकारकडून स्वंयपूर्ण गोवा योजनेची सुरुवात केली. आम्हाला केंद्र सरकारकडून 300 कोटी रुपये देण्यात आले. पंतप्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ प्रत्येक गोमंतकीयपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने आम्ही काम केले. शाश्वत विकासाची ध्येयधोरणे आम्ही राबविली. खऱ्या अर्थना गोव्याचा विकास झाला असेल तो 2014 पासून झाला आहे. गोव्याचा पायाभूत विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी क्षणोक्षणी मदत केली. पंतप्रधानांच्या स्वप्नातील नवभारत करण्यासाठी आम्ही गोव्याच्या जनतेबरोबर सातत्याने काम करत राहू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT