गोवामुक्तीच्या (Goa Liberation Day) हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त गेले वर्षभर आयोजित कार्यक्रमांच्या समारोप सोहळ्याच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यानिमित्त राज्य सरकारने रविवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गोमंतकीयांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मोदी दुपारी आपल्या विशेष विमानाने (special plane) दाबोळी हंसतळावर उतरले.यावेळी त्यांचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई, सभापती राजेश पाटणेकर, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत(CM Pramod Sawant), शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो व इतर मान्यवर उपस्थित होते. तेथून ते हेलिकॉप्टरने थेट पणजीतील आझाद मैदानावर रवाना झाले व गोवा (Goa) मुक्तीसाठी प्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. तेथून ते मिरामार किनाऱ्याकडे रवाना झाले आणि तेथील सेल परेड तसेच फ्लाय पास्ट कार्यक्रमांना उपस्थिती लावली. तेथून ते बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये मुख्य कार्यक्रमासाठी दाखल झाले.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी नूतनीकरण करण्यात आलेला आग्वाद किल्ला, गोमेकॉतील (GMC) सुपरस्पेशालिटी विभाग, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाची इमारत, मोपा येथील कौशल्य विकास सेंटर व दवर्ली येथील गॅस इन्सुलेटेड उपकेंद्र या पाच प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
चार स्वातंत्र्य सैनिकांसह ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेत दर्जेदार कामगिरी केलेल्या सहा पंचायती आणि सहा स्वयंपूर्ण मित्रांना मोदींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी गोमंतकीय जनतेला संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कार्यक्रमांसाठी पणजीत असल्याने आझाद मैदान-मिरामार(Miramar)- दोनापावला(Dona Paula) -श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम या मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास बंद ठेवण्यात आली होती. तसेच दाबोळी विमानतळ परिसरात व प्रत्येक नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.