Panjim Pay Parking 
गोवा

Panjim Pay Parking: पे-पार्किंग फलकावरील दराचा भाग गायब; पर्यटकांसह स्थानिकही संभ्रमात

पणजीत चर्चा : कंत्राटदाराची मुदत संपल्याचा वादाचा विषय पुन्हा वर

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Pay Parking पणजी शहरातील खांबावर लावलेल्या पे-पार्किंग फलकावरील दराचा भाग गायब झाला आहे. त्यामुळे पार्किंगचे पैसे घेणारे पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत, असा आरोप नुकताच आम आदमी पक्षाच्या सिसील रॉड्रिग्स यांनी केला होता.

त्यानंतर पे-पार्किंगच्या कंत्राटदारास सहा महिन्यांच्या दिलेल्या वाढीव मुद्यावर नगरसेवकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा सुरू झाली. अखेर महानगरपालिकेच्या मागील बैठकीत उदय मडकईकरांनी जोरदार आक्षेप घेऊनही त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचेच दिसून येत आहे.

मागील सभेत पे-पार्किंग कंत्राटदार कंपनी असलेल्या जुवारकर असोसिएट्सला सहा महिन्यांची वाढीव मुदत दिल्याचे पत्र आयुक्त क्लेन मदेरा यांनी बैठकीत दाखविले. परंतु कंत्राटदाराला वाढीव मुदत द्यावी, अशी शिफारस आपण केलीच नव्हती.

आपल्या नावाचा गैरवापर केला गेला, असे सांगत मडकईकर यांनी बैठकीत आयुक्तांवर आगपाखड केली होती. त्याशिवाय आपण याविषयी राज्यांच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचेही म्हटले होते.

त्यावेळी ते पत्र मागे घेण्याची सूचनाही करण्यात आली होती. परंतु आयुक्तांनी ते पत्र मागे घेतले नसावे, त्यामुळेच हा विषय नगरसेवकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर चघळला जाऊ लागला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे पे-पार्किंगचे कंत्राट घेतलेल्या कंपनीची मुदत संपली तरी ते पैसे का उकळत आहेत, असा सवाल नगरसेवकच उपस्थित करीत आहेत. विशेष बाब म्हणजे काही ठिकाणी पे-पार्किंगचे फलक आहेत, त्याठिकाणी पार्किंगचे पैसे घेणारे कर्मचारी आहेत, परंतु जे फलक आहेत, त्यावरील पार्किंगचे दरच दिसत नाहीत.

एकतर दराचा भाग काढून टाकला आहे किंवा तो भाग फाडण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना सोडाच स्थानिकांनाही पार्किंग दर निश्‍चित समजत नाहीत, अशी स्थिती आहे.

नावाचा गैरवापर झाला

याबाबत नगरसेवक मडकईकर यांना विचारणा केली असता, आपण याविषयी सोमवारी योग्यप्रकारे पडताळणी करणार असून त्यानंतरच पुढील निर्णय घेणार आहे. आपल्या नावाचा गैरवापर झाला आहे, हे आपण बैठकीतच सांगितले आहे.

परंतु कंत्राटदाराची मुदत संपल्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया करायला हवी होती, ती न करण्यामागचे कारण काय? हे मात्र समजू शकले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT