PM Modi praises Goa for harnessing solar power: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा ऊर्जा विकास संस्था, नवीन आणि अक्षय ऊर्जा विभाग आणि वीज विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. गोव्याच्या वतीने अक्षय उर्जेच्या बाबतीत केले जाणारे प्रयत्न राज्याच्या शाश्वात हितासाठी प्रेरक आणि चालना देणारे ठरतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात अक्षय उर्जेला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ रिट्विट करत सरकारच्या प्रयत्नांन प्रोत्साहन दिले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना, पंतप्रधान मोदी काय म्हणाले.
"गोवा राज्य करत असलेल्या सौर शक्तीचा उपयोग पाहून आनंद झाला. या सहयोगी प्रयत्नामुळे शाश्वत विकासाला नक्कीच चालना मिळेल."
गोवा भरपूर सूर्यप्रकाश आणि रेतीची भूमी असल्याने येथे सौर ऊर्जा आणि शाश्वत ऊर्जा वापरासाठी पोषक वातावरण आहे.
गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, नवीन आणि अक्षय ऊर्जा विभाग तसेच, गोवा विद्युत विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अनुकूल पोर्टलद्वारे सुलभ सौर पॅनेल इंस्टॉलेशन्ससाठी सबसिडी सुरू करण्यात आली आहे. यामुळे गोव्यातील लोकांना पर्यावरण-स्नेही उर्जा वापराचे निर्णय घेण्यास सोपे झाले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ठरवलेल्या परिवर्तनाच्या मार्गावर सरकार मार्गक्रमण करत आहे. राज्यात सर्वत्र सौरऊर्जेवर आधारित घरे निर्माण करणे, तसेच गोव्याच्या हिरित आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी सरकार महत्त्वपूर्ण पाऊले टाकत आहे. असे सावंत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.