LPG gas cylinder prices have gone up Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील गृहिणींचे वांदे: LPG गॅस दरात 25 रुपयांनी वाढ

गोव्यात (Goa) घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीने (LPG gas cylinder) पेट घेतला आहे. 25.50 रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर महाग

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात (Goa) कोविड महामारीच्या (Covid-19) काळात इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत असताना आता घरगुती गॅस सिलिंडरने (LPG gas cylinder) पेट घेतला आहे. त्याच्या किमतीत 25.50 रुपयांनी वाढ झाल्याने गृहिणींचे आर्थिक नियोजन बिघडणार हे नक्की. घरगुती गॅस सिलिंडरसाठी (LPG) आता 848.50 रुपये तर व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी 1 हजार 604 रुपये मोजावे लागत आहेत. कोविड महामारीत अनेकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. घराचे बजेट कोलमडत असतानाच महागाईने पुरते भुईसपाट करायचे ठरवल्यानंतर सिलिंडरही महागल्याने थेट जेवण कसे शिजवायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (The price of an LPG cylinder in Goa is Rs 848.50)

अनुदानाचे काय : मोदी सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर अनुदान देण्याची मोठी घोषणा केली होती. मात्र ही योजना गेल्या वर्षभरापासून बंदच आहे. तिचे काय झाले, याची कुणालाच कल्पना नाही. केंद्र सरकारने दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी गॅस सिलिंडरचा प्रत्यक्षातील दर आणि अनुदानित दर यांच्यातील तफावतीची रक्कम ग्राहकाच्या खात्यात थेट जमा करण्याची योजना आखली आणि तिची अंमलबजावणी सुरू केली. फरकाची रक्कम मिळत असल्याने ग्राहकांनी सिलिंडर दरवाढीकडे दुर्लक्ष करणे सुरू केले.

दरम्यान, मार्चमध्ये घरगुती गॅस सिलिंडर 833 रुपयांना मिळत होते. मे मध्ये त्यात वाढ होत ते 823 रुपयांना मिळायला लागले. त्यानंतर आता ते 834.50 रुपयांना मिळत आहे.

गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद केल्‍याची माहिती सरकारने ग्राहकांना दिली नाही, ही ग्राहकांची फसवणूक आहे. यापूर्वी अनुदान भलत्याच खात्यात जमा करण्याचे प्रकार घडले आहेत. आता गेल्या वर्षभरात अनुदान देणेच सरकारने थांबवले आहे. यात गॅस पुरवठादार कंपन्यांचा दोष नाही.

- रोलंड मार्टिन्स, समन्वयक, गोवा कॅन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT