पणजीत स्मार्ट सिटी आणि ‘जी-२०’ शिखर परिषदेनिमित्त विविध कामे सुरू आहेत. परंतु त्यातील अनेक कामांविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या बाजूला पथदिवे लावताना चौथऱ्यावर उभा केलेल्या खांबाखाली चार ठिकाणी नटबोल्ट लावले खरे.
पण त्यातील तीन इतरत्रच लावले आहेत. त्यामुळे अव्यवस्थित झालेल्या कामांमुळे धोक्याची शक्यता असून त्यातून जनतेच्या पैशांचा निव्वळ अपव्यय होत असल्याचेच दिसून येते.
पथदिपाच्या अशा कामांची छायाचित्रे समाजमाध्यमांतून अधून-मधून व्हायरल होत असतात. मागे काही दिवसांपूर्वी मांडवी नदी किनाऱ्यावरील कठडा उभारण्यासाठी सिमेंट वाळू मिश्रण तयार करण्यासाठी नदीतील खराब पाण्याचा वापर करण्यात आला होता. हा व्हिडिओ बराच चर्चेत राहिला. आता जी कामे करण्यात आली आहेत, त्याविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत.
एका पथदिपाचा खांब चौथऱ्यावर उभा करण्यासाठी खांबाला खालील बाजूस असलेल्या लोखंडी प्लेटमध्ये चार नट-बोल्ट लावण्याची सोय आहे. परंतु चार नटबोल्ट लावले खरे, पण त्यातील एक नटबोल्ट हा लोखंडी प्लेटला असलेल्या छिद्रामध्ये लावण्यात आला आहे. तर तीन नटबोल्ट लावण्यासाठी लोखंडी प्लेटला छिद्र आहेत.
पण तेथील चौथऱ्यावरील नटबोल्टचे मोजमाप चुकले आहे. खांबाला लावलेल्या लोखंडी प्लेटचे मोजमाप चुकले की चौथारा तयार करणारे चुकले आहेत, ते काही समजण्यासारखे नाही. यासारखे अनेक प्रकार शहरात पाहायला मिळत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.