Goa Dairy : गोवा डेअरीची वाटचाल ‘संजीवनी’च्या दिशेने ; दूध उत्पादकांत खळबळ उडाली

स्थिती खालावली : सहा कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाईने शेतकऱ्यांत खळबळ
Goa Dairy
Goa DairyDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda : याा त्या कारणाने सतत वादात राहिलेल्या राज्यातील एकमेव दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीच्या 14 आजी-माजी संचालकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. गोवा सहकार निबंधकांनी हा निर्णय आज (शुक्रवारी) दिल्याने दूध उत्पादकांत खळबळ उडाली आहे.

गोवा डेअरीच्या सहा कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेल्या गोवा डेअरीची नंतरच्या काळात स्थिती खालावत गेली असून आता तर गोवा डेअरीची वाटचाल संजीवनी साखर कारखान्याप्रमाणे होणार काय, अशी भीती दूध उत्पादकांत व्यक्त होत आहे.

गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष माधव सहकारी म्हणाले, की गोवा डेअरीच्या संचालक मंडळावर निवडून येऊन मी स्वतः मागच्या काळात अध्यक्षही झालो, पण डेअरीच्या विरोधात कोणतेच कृत्य केले नाही. गोवा डेअरी ही आमची स्वतःची दूध उत्पादकांची संस्था आहे, याची जाणीव ठेवून एवढी वर्षे काम केले.

Goa Dairy
Ponda Municipal Council Election : फोंडा पालिकेत सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे दबावतंत्र : केतन भाटीकर

नवे मंडळ नऊ महिन्यात गायब

प्रशासकांच्या सद्दीनंतर गोवा डेअरीची गेल्या 14 जून 2022 रोजी संचालक मंडळासाठी निवडणूक झाली. त्यानंतर 18 जुलै 2022 मध्ये संचालक मंडळ सत्तारूढ झाले. राजेश फळदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली हे संचालक मंडळ कार्यरत झाले, पण संचालक मंडळातील सदस्य माधव सहकारी व अनुप देसाई यांनी गेल्या डिसेंबरमध्ये संचालक पदाचे राजीनामे दिले. हे राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत तब्बल दीड महिन्यांनी स्वीकारण्यात आले.

आतापर्यंतचे प्रशासक

गोवा डेअरीवर 2018 पासून प्रशासक नेमला गेला. मध्यंतरीचा फक्त 4 महिन्यांचा कार्यकाळ सोडला तर ही प्रशासकाची सद्दी 2022 पर्यंत चालली. सुरवातीला 6 सप्टेंबर 2018 रोजी दामोदर मोरजकर, 28 जानेवारी 2019 ला संतोष कुंडईकर, 14 ऑगस्ट 2019 ला विलास नाईक, 1 ऑक्टोबर 2019 ला अरविंद खुटकर तर त्यानंतर 1 जून 2020 रोजी दुर्गेश शिरोडकर असे पाच प्रशासक गोवा डेअरीने पाहिले.

Goa Dairy
Ponda - Sanquelim Municipal Council Election 2023: 30 जणांची माघार, 74 उमेदवार रिंगणात; भाजपची यशस्वी रणनीती

त्यात सर्वाधिक काळ दुर्गेश शिरोडकर यांचा ताबा होता. 1 जूनला शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंत कामत व अवित नाईक हे अन्य दोन सदस्य असे त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ कार्यरत झाले.त्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक झाली, त्यावेळी ही समिती बरखास्त केली.

डेअरीच्या तोट्यात वाढच ! : गोवा डेअरीत कालचा दूध आकडा 52 हजार लिटर असा होता. गोवा डेअरीचे मागच्या काळात 70 हजार लिटरपर्यंत दुधाचे वितरण गेले होते, पण हा आकडा आता 52 हजारांवर आला असून गोवा डेअरी तोट्यात चालल्याचे स्पष्ट झाले आहे.

Goa Dairy
Ponda Municipal Council Election 2023: जादूची कांडी फिरली अन् पुनाळेकर बिनविरोध

पराग नगर्सेकर यापूर्वी होते ‘एमडी‘ :

गोवा डेअरीच्या प्रशासकपदी नियुक्ती झालेले पराग नगर्सेकर हे यापूर्वी गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. 15 जुलै 2022 रोजी पराग नगर्सेकर यांनी गोवा डेअरीचे एमडी म्हणून ताबा स्वीकारला होता. तर 5 डिसेंबर 2020 रोजी एमडी पदाचा ताबा सोडला होता. नवीन व्यवस्थापकीय संचालक योगेश राणे यांच्याकडे नगर्सेकर यांनी हा ताबा दिला होता.

सहकार निबंधकांना कारवाई करायची होती तर सर्वच संचालकांवर करायला हवी होती, पण थोड्यांना वगळून काहींना चुचकारून तर काहीजणांवर थेट कारवाई करणे म्हणजे हा प्रकार अन्यायकारक आहे. वास्तविक प्रशासकांच्या कारकिर्दीत तेरा कोटींचा गैरव्यवहार झाला, याला कोण जबाबदार. संबंधितांवर कारवाई होईल का, याची आधी उत्तरे सरकारने द्यावीत.

- माधव सहकारी, माजी अध्यक्ष गोवा डेअरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com