Jose Philip D'Souza Dainik gomantak
गोवा

'कूटनीती करणार्‍या भाजपला जनता योग्य जागा दाखवणार'

राज्य निवडणूक आयोगाच्या कोविड-19 नियमाचे पालन करून अनेक पक्ष आपला प्रचार करत आहेत

दैनिक गोमन्तक

राज्य भाजपला गोवा विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी महायुती हा एकच पर्याय विरोधीपक्षा समोर उभा राहिलेला आहे. वाढत्या महागाई बरोबर बेरोजगारीमुळे जनता सत्ताधारी पक्षावर नाराज झालेली असल्याने त्यांना हद्दपार करण्यासाठी महायुती महत्त्वाची ठरेल, असे प्रतिपादन गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा दाबोळीचे उमेदवार जुझे फिलिप डिसोझा यांनी केले.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सत्ताधारी भाजप (BJP) बरोबर विरोधी पक्षांनी जोरदार प्रचार आपल्या कार्यकर्त्यांसह सुरू ठेवला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोविड-19 नियमाचे पालन करून अनेक पक्ष आपला प्रचार करत आहेत.

दाबोळी मतदारसंघात आम आदमी पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन घरोघरी प्रचार करत आहेत. जुझे फिलिप डिसोझा यांना दाबोळीत वाढता प्रतिसाद लाभत असल्याने, त्याने आपल्या प्रचारा वेळी विविध समस्या जनते समोर मांडून सत्ताधारी भाजप पक्षाची हुकूमशाही जनतेसमोर मांडली. भाजपने देशाबरोबर राज्यात सर्व गरजू वस्तूत वाढ करून एका प्रकारे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

गोव्यातील (goa) जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कूटनीती करणार्‍या भाजपला त्याची योग्य जागा दाखवणार असल्याची माहिती डिसोझा यांनी दिली.

दाबोळीत राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षाचा प्रचार सध्या जुझे फिलिप डिसोझा यांनी जोराने सुरू केला आहे. डिसोझा आपल्या प्रचारात दोन फेऱ्या सध्या दाबोळीइत पूर्ण केल्या आहे. या वेळी बोलताना जुझे फिलिप डिसोझा म्हणाले की राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे महायुती, यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. राज्यात यंदा मोठा बदल होणार असल्याने सत्ताधारी पक्ष घाबरला असल्याची माहिती जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT