गोव्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजले आहे. यातच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची (Election) तयारी सुरु केली आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी राज्यातील नेतृत्व निकराने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी तृणमुलसह इतर राजकीय पक्षांनी मोट बांधली आहे. या पाश्वभूमीवर बोलताना वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणले की, ‘गोव्यात भाजप विरोधकांची कथित महाआघाडीसाठी चालू असलेली धडपड म्हणजे बुडणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन बचावासाठी चालविलेल प्रयत्न’ तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘भाजप (bjp) प्रबळ असल्याचीही त्यांची कबुलीच आहे.’ भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माविन गुदिन्हो म्हणाले.
‘विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) गोव्यात (goa) केवळ भाजपच सत्तेवर येणार याबद्दल विरोधकांना पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच सर्व विरोधक घाबरून एकत्र येण्याची भाषा करत आहेत. महागठबंधन किंवा महाआघाडी हा तसलाच प्रकार आहे’ अस म्हणत त्यांनी महाआघाडीचा खरपूस समाचार घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.