marriage dainik gomantak
गोवा

Panaji Court: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीने पीडितेशी बांधली लग्नगाठ; कोर्टाने दिला 'हा' निर्णय

Accused Marries Victim, Court Verdict: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला पुराव्याअभावी पणजी जलदगती न्यायालयाने निर्दोष ठरवले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला पुराव्याअभावी पणजी जलदगती न्यायालयाने निर्दोष ठरवले. आरोपीने पीडित तरुणीशी विवाह केल्याने तरुणीने बलात्काराचा नोंदवलेला गुन्हा मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. त्यात तिने आपण आनंदी जीवन जगत असल्याचेही नमूद केले होते. ही दखल घेत न्यायालयाने हा निर्णय दिला.

आरोपी व पीडित तरुणीचे चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळताच तरुणीच्या वडिलांनी तिच्यावर दबाव आणून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यास लावले होते. त्यानुसार तिने पोलिसांत जबानी देत तक्रार दाखल केली. तरुणीच्या वडिलांनी मुलीचे एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न जुळवले होते व विवाह नोंदणीही केली होती.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यावरील सुनावणी सुरू असताना पीडित तरुणीने आरोपीबरोबर विवाह केला. न्यायालयातील खटल्यात जबानी देताना प्रियकराविरुद्धचे आरोप मागे घेतले होते. त्यांचे संबंध होते व त्याने कोणताही गुन्हा केलेला नसल्याची जबानी न्यायालयात दिली होती.

त्याने लैंगिक संबंधासाठी कधीही जबरदस्ती केली नसल्याचे सांगितले होते. आरोपीशी विवाह झाल्याने या खटल्यावरील सुनावणी पुढे चालवण्यात येऊ नये, अशी विनंती न्यायालयाला तिने केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aropra Nightclub Fire: रोमिओ लेन प्रकरणात 'बेली डान्सर' अडकली! केलं कायद्याचं उल्लंघन; क्रिस्टीनाला 'काम' करण्याची परवानगी नव्हती?

अग्रलेख: निष्काळजीपणा नव्हे, सदोष मनुष्यवध! हडफडे दुर्घटनेने हादरवलं; नियमभंगाच्या कुबड्यांवर तग धरलेली व्यवस्था

माणुसकीशून्य कोडगेपणा! तत्परतेसाठी 25 लोक जळून मरायची वाट का पाहिली? देशभर नाचक्की झाल्यावर 'इभ्रत' राखण्याची मोहीम- संपादकीय

Arpora Nightclub Fire : हडफडे अग्नितांडव! अजय गुप्ताला दिल्लीतून अटक, 'गोगी टोळी'सह 'काळ्या पैशाचे' लागेबांधे उघड

Goa Live Updates: 'दिल्ली भेटीचा' व्हायरल फोटो खरंतर 'प्रँक'! मनोज परब यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT