Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; डिचोलीतील खळबळजनक घटना

Bicholim Crime: शिक्षकाकडूनच एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार डिचोलीतील एका शाळेत घडला आहे.
Published on

डिचोली: शिक्षकाकडूनच एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार डिचोलीतील एका शाळेत घडला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, संबंधित शिक्षकाची अटक अटळ आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे डिचोलीत खळबळ माजली असून, याप्रकरणी जोरदार चर्चा सुरु आहे. हा प्रकार डिचोली तालुक्यातील महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या एका ग्रामीण भागातील हायस्कूलमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे.

Goa Crime News
Margao Abduction Case: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पालकांनी डिचोली पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ''पॉक्सो'' कायद्याखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com