dwarf tree art Book Publication Dainik Gomantak
गोवा

Book Publication : ‘वामन वृक्ष कले’ची सुरूवात भारतातच : उपराष्ट्रपती जगदीप धनकड

Book Publication : ‘ राज्यपालांच्‍या दोनशेव्या पुस्तकाचे प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

Book Publication : ‘ पणजी, बोन्साय ज्याला ‘वामन वृक्ष कला’ संबोधले जाते, ती इतर देशांतून आलेली नाही. या कलेची सुरूवात ५ हजार वर्षांपूर्वी भारतातच झाली आहे. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी वामन वृक्ष कला पुस्तकासंबंधी सविस्तर पुराव्यासहित माहिती दिली आहे.

वामन वृक्ष कलेची सुरूवात भारतातच झाल्याचे उपराष्‍ट्रपती जगदीप धनकड यांनी सांगितले. ते दरबार हॉल राजभवन येथे आयोजित ‘वामन वृक्ष कला’ या राज्यपाल लिखित २००व्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला संबोधित करत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार क्रीडापटू पी. टी. उषा व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो उपस्थित होते.

खासदार पी.टी. उषा यांनी वामन वृक्ष कला हे पुस्तक साहित्याच्या विश्‍वातील एक महत्‍त्वपूर्ण घटना असल्याचे सांगितले. मावजो म्हणाले, आम्हाला झाडापेडांवर प्रेम करणारे साहित्यिक राज्यपाल लाभले आहेत. त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. राज्यपाल म्‍हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे.

गोमंतकीयांच्या वतीने अभिनंदन

राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांचे हे दोनशेवे पुस्तक आहे. त्यांच्या साहित्यिक कारकर्दिला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे ‘वामन वृक्ष कला’ हे महत्त्वपूर्ण संशोधनात्मक पुस्तक आहे. त्यांनी भविष्यातही उत्तमोत्तम ग्रंथसंपदा निर्माण करावी. आम्हाला पिल्लईंसारखा राज्यपाल लाभल्याने गोमंतकीयांसाठी अभिमानाची बाब असून मी समस्त गोमंतकीयांच्या वतीने आपले अभिनंदन करत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्यपाल पिल्लई जादूगार ः धनकड

आम्ही लोकशाही प्रधान समाजात राहते. येथे प्रत्येच्या विचारांच्या नागरिकांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे. आज या कार्यक्रमाला राज्यातील सर्व धर्माचे, पंथाचे, अधिकारी वर्ग, सर्वसामान्य जनता, साहित्यिक सर्व उपस्थित आहेत. ऐरव्ही कोणत्याही राज्यपालांच्या कार्यक्रमाला अशा प्रकारे नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत नाहीत.

त्यांचे गोव्यातील जनतेशी असलेले नाते दिसून येते. राज्यपाल पिल्लई हे जादूगार असल्याचे गौरवोद्‍गार उपराष्ट्रपती धनकड यांनी काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT