Goa Assembly Session 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa: आजपासून हिवाळी अधिवेशन

अधिवेशनात म्हादई विषयावरून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Session 2023: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून चार दिवस चालणारे हे अधिवेशन म्हादई विषयावरून तापणार, हे स्पष्ट आहे. सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. या अधिवेशनासाठी १३४ तारांकित, तर ४७५ अतारांकित प्रश्‍न आले आहेत, अशी माहिती विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी दिली.

विधानसभा सदस्यांनी १३४ तारांकित, तर ४७५ अतारांकित प्रश्‍न विचारले असले, तरी हे चारदिवसीय अधिवेशन म्हादई या विषयावरूनच गाजणार आहे. या वर्षातील हे पहिले अधिवेशन असल्याने सोमवारी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई अभिभाषण करतील. तर १७ आणि १८ जानेवारीला या अभिभाषणावर आभाराची चर्चा होईल. १९ जानेवारीला संपूर्ण दिवस म्हादई विषयावर चर्चा होईल, असे सरकारने आधीच जाहीर केले असून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्येही यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

कर्नाटक आणि गोव्यामध्ये गाजत असलेल्या म्हादई प्रश्‍नावरून स्वतंत्र अधिवेशन घ्यावे किंवा म्हादईच्या विषयावर स्वतंत्र चर्चा व्हावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक आक्रमक आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्येही हा विषय तापला होता. विरोधकांनी हीच मागणी करत सरकारवर टीकास्त्र सोडले होते. आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटणार, हे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

SCROLL FOR NEXT