Digambar Kamat : मडगाव नगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात असलेल्या खुल्या जागांचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे अशी माहिती आमदार दिगंबर कामत यांनी आज आके येथे दिली. तेथील वनखाते निवासी वसाहती जवळील खुल्या जागेच्या सौंदर्यीकरणाचा शुभारंभ केल्यावर ते बोलत होते. यावेळी नगरसेवक दामोदर शिरोडकर, दामोदर वरक, योगीराज कामत व अन्य मंडळी उपस्थित होती.
आमदार दिगंबर कामत पुढे म्हणाले की, या कामासाठी आर्किटेक्टकडून आराखडा तयार करुन घेतला आहे. त्यानुसार सौंदर्यीकरण आणि अन्य सुविधा केल्या जातील. पूर्वी अशी रक्कम गटारे रस्ते यावरच खर्च होत होती ती पध्दत बदलून खुल्या जागा सुशोभित केल्या जातील अशी माहितीही त्यांनी दिली. या कामावर सुमारे पंधरा लाख रुपये खर्च होतील आणि तो नगरपालिकेतर्फे केला जाईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान राज्यातील शंभरपेक्षा जास्त तळ्यांचा 2023 पर्यंत विकास करून त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे, असे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पालिका क्षेत्रातील नगर्से येथील 43 लाख रुपये खर्चून विकास केलेल्या तळ्याचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले.
उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी 55 तळ्यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. केपे, काणकोण व काणकोणमधील आठ पुरातन तळ्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. नोव्हेंबरपर्यंत काणकोणातील चार तळ्यांच्या विकासासाठी भूमीपूजन करण्यासाठी काणकोणात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.