Panaji Dainik Gomantak
गोवा

Panjim: स्मार्ट की बेबद्यांची सिटी? गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापकांची पोस्ट चर्चेत, युरी आलेमावही म्हणाले...

गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापकांची ती पोस्ट का होते आहे व्हायरल ?

Sumit Tambekar

गोवा राज्यात चोरी, मारामारी, अमली पदार्थांची तस्करीसारखे गुन्हेगारीचे प्रकार वाढले असल्याची ओरड नागरिकातून होत आहे. या पार्श्वभूमीवर पणजीमध्ये खुलेआम मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे म्हणत नाराजी व्यक्त करणारे एक ट्वीट गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी शेअर केले आहे. हे ट्वीट आता गोव्यात चर्चेचा विषय बनले आहे. यावरुन विरोधी पक्षांनी देखील गोवा सरकारवर निशाणा साधला आहे.

(The number of drunkards has increased in Panaji Opposition leader Yuri Alemao criticized the Goa government )

सविस्तर वृत्त असे की, गोव्याच्या राजधानी पणजीमध्ये सर्वत्र खुलेआम मद्यपान करणाऱ्यांची वाढली आहे. असे गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक आदित्य सिनाई भांगुई यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे. या ट्वीटमध्ये भांगुई यांनी पणजी स्मार्ट सिटी आहे की, बेवड्यांची ( बेबद्यांची ) सिटी असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी या समस्येवर लक्ष देत उपाय योजना करण्याची मागणी प्राध्यापक भांगुई यांनी केली आहे.

प्राध्यापक भांगुई यांनी केलेल्या ट्वीटचा संदर्भ देत काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी म्हटले आहे की, सध्या गोव्याच्या राजधानीतील दृश्य ही विदारक आहेत.

कोणाचे नियंत्रण नसल्याने अशा अवैध कृत्य करणाऱ्यांवर आळा घालणार कोण? असा प्रश्न पडला असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे. त्यामुळे गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापकांशी मी सहमत आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT