Vasco: भाडेकरू पडताळणीला वेग; खारीवाडा येथील शंभर जण ताब्यात; घरमालकांचे धाबे दणाणले

''मोठ्या गुन्ह्यात अडकलेले गुन्हेगार भुरट्या चोरट्यांपासून विविध गुन्हे करून घेतात''
Vasco
VascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: पडताळणी अर्ज न भरलेल्या खारीवाडा येथील शंभरहून अधिक भाडेकरूंना आज ताब्यात घेऊन वास्को पोलीस स्थानकावर आणण्यात आले. तेथे त्यांची सविस्तर चौकशी करण्यात आली आहे. याप्रकरणी घरमालकांच्या विरोधातही कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

(Vasco police arrested 100 tenants of Khariwada who did not fill verification forms)

गुन्ह्यांत अडकलेले गुन्हेगार, दहशतवादी, ड्रग्ज माफिया, बांगलादेशी घुसखोर गोव्यात बिनधास्तपणे भाड्याच्या खोलीत राहतात आणि भुरट्या चोरट्यांपासून विविध गुन्हे करून पसार होतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित पोलीस स्थानकात भाडेकरूचा पडताळणी अर्ज भरणे सरकारने बंधनकारक केले आहे. घरमालक किंवा भाडेकरूंनी हा अर्ज भरणे आवश्यक आहे. अन्यथा तो कायदेशीर गुन्हा ठरतो. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी भाडेकरू पडताळणी मोहीम सुरू केली आहे.

Vasco
Sanguem: पाण्याची तीव्र टंचाई; नागरिकांंमध्ये उसळली संतापाची लाट
Vasco
VascoDainik Gomantak

पडताळणी मोहिमेअंतर्गत मंगळवारी व आज वास्कोच्या खारीवाडा भागात निरीक्षक कपिल नायक व उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने येथील भाडेकरूंची कसून चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या तपासात विविध भाडेकरूंची माहिती व शंभरहून अधिक जणांनी पडताळणी अर्जच केला नसल्याचे समोर आले आहे. त्या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकावर चौकशीसाठी आणण्यात आले आहे.

Vasco
Mopa Airport : पर्यटकांच्या स्वागतासाठी मोपा विमानतळ सज्ज; 'या' तारखेपासून होणार खुलं

खारीवाडा येथे बरेच परप्रांतीय कामगार

खारीवाडा येथे मासेमारी बोट, होडीवर काम करणारे बरेच परप्रांतीय कामगार राहतात. ते कामगार बिहार, झारखंड व इतर राज्यांतील असतात. त्यांना आपल्याकडे कामगार म्हणून काम देणारे त्यांची सोय तेथील खोल्यांमध्ये करतात. त्यामुळे त्या मालकाने त्यांची माहिती पोलिसांना देण्याची गरज असते. परंतु ती माहिती देण्यात येत नसल्याचे पडताळणी मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com