Accident Death In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: अपघात बळींचा आकडा अडीचशे पार

Goa Accident Death: 171 दुचाकीस्वार ठार : प्रत्‍येक तिसाव्‍या तासाला जातो एकाचा बळी

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळयेकर

Goa Accident Death: मागील रविवारपासून गोव्‍यात अपघाती मृत्‍यूंची संख्‍या झपाट्याने वाढत असून पहिल्‍या चार दिवसांतच एकूण सातजणांचा बळी गेला आहे. 1 जानेवारी 2023 ते आतापर्यंत रस्‍ता अपघातांतील बळींची आकडेवारी पाहिल्‍यास ही संख्‍या 251 वर पोचली असून प्रत्‍येक तिसाव्‍या तासाला एक बळी जात असल्‍याचे दिसून आले आहे.

ही अतिॆशय गंभीर स्‍थिती असल्‍याचे तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे. रविवार, १९ नाेव्‍हेंंबर रोजी एकाच दिवशी रस्‍ते अपघातात चार जणांचा बळी गेला. यातील चारही मृत दुचाकीचालक आहेत.

बेलाबाय-वास्‍काे येथे समीर गोसावी (५२), धारबांदाेडा येथे गाेकुळदास गावकर (४५), पर्वरी येथे श्रीपाद मोरजकर (५४), तर सुळकर्णे येथे सदानंद गावकर (३५) या चार जणांचा त्यात समावेश आहे.

यातील तीन स्‍वयंअपघात असून सदानंद गावकर याच्‍यावर गव्‍याने हल्‍ला केल्‍याने त्‍याने दुचाकी झाडाला ठोकर दिली. त्यातच त्‍याचा मृत्‍यू झाला. मंगळवार, २१ राेजी तुळशीदास नाईक (६७) या वृद्धाचा राय येथे बळी गेला, तर २२ राेजी मंगेशी येथे विराज दाभोळकर या ३२ वर्षीय युवकाच्‍या दुचाकीला टेम्‍पोने धडक दिल्‍याने त्‍याचा बळी गेला. तर आगशी येथे प्रशांत कुमार या ओडीशी युवकाचा बळी दुचाकी स्‍वयंअपघातात गेला.

नोव्‍हेंबर महिन्‍यात आतापर्यंत रस्‍त्‍यावर १५ जणांचा बळी गेला असून त्‍यातील १४ जण दुचाकीचालक आहेत, तर एका महिलेचा बळी गेला आहे. यामध्‍ये कुचेली येथे मेहबूबखान पठाण (३१), वेळ्‍ळी येथे सेंड्रॉय पिंटो (२०), खोर्ली येथे आकाश गावडे (२३), डिचोली येथे आनंद नाईक (५०), सार्जोरा येथील आग्‍नेल रिबेलो (१९), साखळी येथील गोपाळ पटेल (६५), कुठ्ठाळी येथील योगानंद बांदाेडकर (४१) या दुचाकीस्‍वारांचा बळी गेलेल्‍यांमध्‍ये समावेश आहे.

१२ नोव्‍हेंबर रोजी रेेमेडिया आल्‍बुकेर्क या वृद्ध पादचारी महिलेला वागातोर येथे कारने धडक दिल्‍यामुळे तिचा मृत्‍यू झाला होता. १५ नोव्‍हेंबर राेजी जुवारीनगर येेथे प्रीती मलीक (२८) या दिल्‍लीच्‍या पर्यटक महिलेच्‍या दुचाकीला कारने धडक दिल्‍याने तिचा मृत्‍यू झाला होता.

दुचाकी अपघातांचे प्रमाण चिंताजनक

राज्यात नोंद होणाऱ्या १० अपघातांत सरासरी एकाचा मृत्यू होत आहे. शिवाय राज्यात झालेल्या अपघाती मृत्युंमध्ये सर्वाधिक ७०.६३ टक्के म्हणजे १७१ मृत्यू दुचाकीचालक आणि त्याच्या मागे बसलेल्या सहप्रवाशांचा झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात कमी, पण मृत्यू जास्त

ऑक्‍टोबर महिन्‍यापर्यंतची जी आकडेवारी पोलिस दफ्‍तरातून मिळाली त्‍यानुसार, राज्यात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या दहा महिन्यांत २,३६८ अपघातांत २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ५.०९ टक्‍क्‍यांनी अपघातांत घट झाली असली तरी अपघाती मृत्यूंचे प्रमाण ८.२९ टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

youtube.com/watch?v=cGQJ13egMlA

हेल्मेटचा अभाव मुख्य कारण

गेल्या 11 महिन्‍यांत राज्यात जे 2लोक रस्‍ते अपघातात ठार झाले, त्‍यापैकी १७१ जण दुचाकी अपघातांतील बळी आहेत. बहुतेक अपघातांत हेल्‍मेट न घातल्‍यामुळेच दुचाकीस्‍वारांचे प्राण गेले आहेत. त्‍यामुळे हेल्‍मेट वापरासंदर्भात मोठी जागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे, असे मत गोवा कॅन संस्थेचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी व्यक्त केले.

दुचाकीचालकांनी हेल्‍मेट का घातले पाहिजे, आयएसआय प्रमाणित नसलेले हेल्‍मेट घातल्‍यावर काय होते, याविषयी व्‍यापक जागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे. कित्‍येकजण पोलिसांना फसविण्‍यासाठी डाेक्‍यावर हेल्‍मेट घालतात; पण पट्टा बांधत नाहीत. हे प्रकार बंद होण्‍यासाठी स्‍थानिक पंचायती आणि पालिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- राेलंड मार्टिन्‍स, निमंत्रक, गोवा कॅन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT