Mapusa Municipality: तत्कालीन ‘सीओ’च्या निर्णयाची चौकशी

Mapusa Municipality: म्हापसा नगराध्यक्षा मिशाळ : पालिका कायदा उल्लंघन प्रकरणी 15 दिवसांत कारवाई
Mapusa Municipal Council
Mapusa Municipal CouncilDainik Gomantak

Mapusa Municipality: म्हापसा येथील एस.एन.बुर्ये पेट्रोल पंपच्या भाडेपट्टी करार नूतनीकरणासंदर्भात तत्कालिन मुख्याधिकाऱ्यांनी पालिका कायदा नियमावलीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत या कथित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी आजच्या बैठकीत लावून धरली.

Mapusa Municipal Council
Goa BJP: भाजप युवा मोर्चातर्फे साव्हियो कुतिन्होविरोधात तक्रार

त्यानुसार येत्या 15 दिवसांत वरील कराराच्या नूतनीकरण निर्णयाविषयी चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन म्हापसा नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी दिले.

बुधवारी (ता.२२) म्हापसा नगरपालिकेची सर्वसाधारण बैठक नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, उपनगराध्यक्ष विराज फडके व इतर नगरसेवक हजर होते. तर नगरसेवक तारक आरोलकर हे मात्र गैरहजर राहिले.

बैठकीसमोर म्हापशातील एस.एन.बुर्ये पेट्रोल पंपच्या लीज करार नूतनीकरणासंदर्भात विषय मांडण्यात आला असता नगरसेविका कमल डिसोझा यांनी प्रश्न उपस्थित केला की, मुळात तत्कालिन पालिका बैठकीत पालिकेने वरील पेट्रोल पंपच्या कराराचे नूतनीकरण तीन वर्षांचे असेल, असा ठराव घेतला होता.

Mapusa Municipal Council
Electricity Problem: सासष्टीत अनेकांना वीज तोडण्याच्या नोटिसा

मग, नंतर हा ठराव कसा व कुठल्या आधारावर परस्पर बदलून 10 वर्षांसाठी केला. याविषयी तत्कालिन मुख्याधिकारी अमितेश शिरवईकरांच्या या निर्णयाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. कारण हा प्रकार पालिका नियमावलीत नसल्याने त्यांनी तीव्र शब्दांत आक्षेप घेतला.

नगरसेवक अ‍ॅड. शंशाक नार्वेकर यांनीही नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी तत्कालिन मुख्याधिकाऱ्यांच्या या निर्णयाची संबंधित प्राधिकरण, दक्षता तसेच ईडीसमोर तक्रार करण्याची मागणी केली. नगरसेवकांचा विरोध लक्षात घेत, नगराध्यक्षांनी याप्रकरणी पंधरा दिवसांत चौकशी करुन आवश्यक कारवाई करू, असे आश्वासन उपस्थितांना दिले.

‘ती’ रक्कम दोन महिन्यात जमा करा !

नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी वरील पेट्रोल पंपचे लीज नूतनीकरणाप्रश्नी पंपकडून पालिकेला देय रक्कम किती येणे आहे, याची माहिती विचारली. त्यानुसार 70 लाख रुपये येणे असून, या दोन पेट्रोल पंपचा पुढील तीन वर्षांसाठी लीज करार करण्याचा ठराव पालिकेने घेतला. तसेच रक्कम पुढील महिन्याभरात पालिकेत जमा करण्याची सूचना संबंधितास पेट्रोल पंप मालकास करावी, असा निर्णय झाला.

कामगारांच्या मुदतवाढीला आक्षेप

रोजंदारी कामगारांच्या सेवेत मुदतवाढ करण्यात आली. तर नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी पालिका प्रशासकीय कारभारावर टीका केली. कारण, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच पालिकेतील पदे रद्द झाली. परिणामी पालिका प्रशासन ठप्प पडल्याचा आरोप त्यांनी केला. कामे रखडून पालिकेत हेलपाटे होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या मुदतवाढीच्या ठरावास नगरसेवक प्रकाश भिवशेट व अ‍ॅड. नार्वेकर यांनी आक्षेप नोंदविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com