Xeldem Sarpanch Dainik Gomantak
गोवा

Xeldem Sarpanch : शेल्डे सरपंचांवरील अविश्‍‍वास ठराव आठ विरुद्ध तीन मतांनी संमत

बैठकीला अकराही पंचसदस्‍य उपस्थित

दैनिक गोमन्तक डिजिटल

शेल्डे सरपंच दीप्ती नाईक यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव आज सोमवारी ८ विरुद्ध ३ मतांनी संमत झाला. या खास बैठकीला अकराही पंचसदस्‍य उपस्थित होते.

सरपंच नाईक यांच्यावर आठ पंचसदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी आज सकाळी खास बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून केपेचे गटविकास अधिकारी अनिल नाईक उपस्‍थित होते

ज्या आठ पंचसदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता, त्यांनी हात उंचावून ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव आठ विरुद्ध तीन मतांनी संमत करण्यात आला.

उपसरपंच प्रमोद गावस देसाई म्‍हणाले की, सरपंच दीप्ती नाईक या पंचसदस्यांना विश्‍‍वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत होत्या. या पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. आता सरपंचपदाची माळ कविता गावस देसाई यांच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा आहे. तरीसुद्धा कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सरपंच निवडण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

म्‍हणून आणला अविश्‍‍वास ठराव

पंचसदस्य जोहान फर्नांडिस यांच्या रहिवाशी प्रकल्पाचे काम नवीमड्डी-तिळामळ येथे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या प्रश्नावरून या प्रकल्पाविरोधात नवीमड्डी येथील लोकांनी पंचायतीवर मोर्चा नेला होता. त्‍यामुळे सरपंच दीप्ती नाईक यांनी सदर प्रकल्पाचे काम बंद करण्याचा आदेश दिला होता.

मात्र हा आदेश देताना त्‍यांनी अन्‍य पंचसदस्यांना विश्वासात घेतले नव्‍हते. त्‍यामुळेच त्‍यांच्‍यावर अविश्वास ठराव आणल्‍याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT