गोवा
Colvale Crime: कोलवाळ येथे परप्रांतीय चालवत होते बेकायदा कॉल सेंटर; क्राईम ब्रँचकडून 33 जणांना अटक
सूत्रधार गुजरातमधील तर कर्मचारी इतर राज्यातील
Colvale Crime: उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यात कोलवाळ येथे बेकायदा कॉल सेंटर चालवले जात होते. या प्रकरणी गोवा पोलिस दलाच्या क्राईम ब्रँचने 33 जणांना अटक केली आहे. येथील २६ संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या कॉल सेंटरचा व्यवस्थापक हा मूळचा गुजरातचा आहे. तर उर्वरीत कर्मचारी इतर राज्यांमधील आहेत. हे सर्वजण अमेरिकेतून बोलत असल्याचे दाखवले जात होते. तसेच अॅमेझॉन या ई कॉमर्स संकेतस्थळ कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून अनेकांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आल्याचे समजते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.