Electricity scam case hearing Dainik Gomantak
गोवा

वीज घोटाळा प्रकरणी पुढील सुनावणी आता 31 मार्च रोजी

मोविन गुदिन्हो व अन्य संशयित गैरहजर राहिल्याने सुनावणी तहकूब

दैनिक गोमन्तक

मडगाव : माजी विजमंत्री मोविन गुदीन्हो यांचा सहभाग असलेल्या वीज घोटाळा प्रकरणाची सुनावणी संशयित असलेले माजी मंत्री गुदिन्हो आणि अन्य उपस्थित न राहिल्याने तहकूब करण्यात आली. आता ही सुनावणी 31 मार्च रोजी होणार आहे. आज फक्त टी. नटराजन हाच संशयित हजर होता. (The next hearing in the power scam case is now on March 31)

काही कंपन्यांना वीज बिलांमध्ये सवलत देत वीज खात्यात 4 कोटी 52 लाख रुपयांच्या घोटाळा झाला होता. त्याप्रकरणी तब्बल 24 वर्षांनी न्यायालयात (Court) सुनावणी सुरु झाली असून दक्षिण गोवा (South Goa) अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे.

गुन्हा अन्वेषण खात्याने या प्रकरणी माजी वीज मंत्री गुदिन्हो, दोन औद्योगीक कंपन्या व इतर चौघावर न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. सप्टेंबर 1991 मध्ये सरकारने उच्च दाबाची वीज वापराणाऱ्या कंपन्यांना वीज (Electricity) बिलांत पाच वर्षांसाठी 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर मार्च 1995 मध्ये सवलत देण्याची अधिसुचना मागे घेण्यात आली. व मे 1996 मध्ये वीज सवलत संदर्भात नवी अधिसुचना जारी करण्यात आली. व याच अति उच्च दाबाची वीज वापरणाऱ्यांनाही सवलत देण्याचे कलम त्यात समावीष्ट करण्यात आले. तेव्हा टी नागराजन हे वीज खात्याचे मुख्य अभियंता व मॉविन गुदिन्हो वीज मंत्री होते.

तेव्हाचे विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यावर डिसेंबर 2006 साली सत्र न्यायालयात (Sessions Court) आरोपपत्र सादर करण्यात आले होते. 17 मार्च रोजी हे प्रकरण सत्र न्यायायलात सुनावणीस आले तेव्हा मॉविन गुदिन्हो उपस्थित नव्हते. पण टी. नागराजन, कृष्ण कुमार उपस्थित होते. त्यामुळे ही सुनावणी आज ठेवली होती. मात्र आजही संशयित गैरहजर राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Goa Fraud Case: प्रोजेक्टमध्ये 'गुंतवणुकीचे' आमिष दाखवून गोव्यातील एकाला 1.32 कोटींचा गंडा; केरळमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल

LIC Scheme: दिवाळीपूर्वी 'एलआयसी'ची मोठी भेट, 15 ऑक्टोबरपासून सुरु करणार 2 खास योजना; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रस्त्यावर चूल मांडणं पर्यटकांना भोवलं, ना पोट भरलं, ना खिशाला परवडलं!! वाचा नेमकं काय घडलं?

मडगाव रवींद्र भवनचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात; 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण! Video

SCROLL FOR NEXT