'मला वास्कोचा विकास करता आला नाही'

वास्कोमधील अर्धवट कामे विद्यमान आमदार कृष्णा साळकर यांनी पूर्णत्वाकडे न्यावीत
Former MLA Carlos Almeida
Former MLA Carlos Almeidadainik gomantak
Published on
Updated on

वास्को : वास्कोतील विकास कामांना गेल्या दहा वर्षात राज्य सरकारतर्फे मला योग्यरीत्या सहकार्य मिळाले नाही. सरकारच्या या अशा धोरणामुळेच मला वास्कोचा विकास करता आले नाही. मला यात यश आले नाही, अशी खंत माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी रवींद्र भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त दिली. यावेळी त्यांच्या समवेत अँड. मेलविन वाझ, मिलिंद आरोलकर उपस्थित होते. तसेच त्यांनी, वास्कोमधील अर्धवट रखडलेली कामे विद्यमान आमदार कृष्णा साळकर यांनी पूर्णत्वाकडे न्यावीत अशी मागणी ही केली आहे. (I could not develop Vasco says Former MLA Carlos Almeida)

वास्कोत मागील सरकारतर्फे १७ विविध कामांची कामे अर्धवटरित्या तर काही कामे सुरू होण्याच्या मार्गावर होती. मात्र काही कारणास्तव कामे होऊ शकले नसल्याने वरील कामे विद्यमान आमदार कृष्णा साळकर (MLA krishna salkar) यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्णत्वाकडे न्यावीत, अशी मागणी माजी आमदार कार्लुस आल्मेदा (Vasco former MLA Carlos Almeida) यांनी केली आहे. तसेच १७ कामांमध्ये तीन मोठ्या प्रकल्पांची कामे असून त्यात सल्लागार सुद्धा नेमण्यात आली आहेत. त्यामुळे ही कामे हातात घ्यावीत, अशीही मागणी आल्मेदा यांनी केली आहे.

Former MLA Carlos Almeida
सहकाऱ्याचा खून केल्याच्या आरोपातून 'त्या' दोघांची निर्दोष मुक्तता

पुढे माहिती देताना आल्मेदा म्हणाले, वास्कोतील १७ कामा बरोबर यातील तीन मोठ्या प्रकल्पाच कामे विद्यमान आमदार कृष्णा साळकर यांनी पूर्ण करावीत. तसेच वास्को मतदार संघ विकास कामात पुढे न्यावा माझ्यासह मतदारांची मागणी आहे. यात कदंब बसस्थानका (Kadamba bus stand) बरोबर प्रशासकीय इमारत, मासळी मार्केट, मुख्याधिकारी इमारत, सार्वजनिक बांधकाम भूगटार, विभागाचे पंप स्टेशन, मेस्तावाडा, ओरूले, नॉन-मून, धाकतळे, डाऊन मांगोर, नवेवाडेसाठी गोवा शिपयार्ड अशी कामे आहेत. ही कामे साळकर यांनी पूर्णत्वाकडे घेऊन जावे. बायणा येथे सूडा तर्फे मासळी मार्केट, सिमेंटरी (स्मशानभूमी) व कब्रस्तान उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली.

वास्को (Vasco) शहरातील सर्व रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत हॉटमिक्स काम हाती घ्यावे. वास्को येथील चिरकून उडी (सागच्या) खुल्या जागेत शहरातील विविध शाळा (School) मैदान, चालण्याचा ट्रक उभारावा. पाण्याचा, विजेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा मागण्या आल्मेदा यांनी विद्यमान आमदार साळकर यांना पत्रकार परिषदेतून केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com